Dharashiv News : ब्लाउज वेळेवर शिवला नाही म्हणून टेलरला १५ हजार रुपयांचा दंड, धाराशिव येथील घटना
मराठी बातम्या  /  महाराष्ट्र  /  Dharashiv News : ब्लाउज वेळेवर शिवला नाही म्हणून टेलरला १५ हजार रुपयांचा दंड, धाराशिव येथील घटना

Dharashiv News : ब्लाउज वेळेवर शिवला नाही म्हणून टेलरला १५ हजार रुपयांचा दंड, धाराशिव येथील घटना

Aug 01, 2024 03:39 PM IST

Dharashiv News : धाराशिव येथे एका महिला टेलरला ग्राहक मंचाने दणका दिला आहे. महिलेला ब्लाऊज उशीरा शिवून दिल्याने तिला दंड ठोठावण्यात आला आहे.

ब्लाउज वेळेवर शिवलं नाही म्हणून टेलरला हजारो रुपयांचा दंड, धाराशिव येथील घटना
ब्लाउज वेळेवर शिवलं नाही म्हणून टेलरला हजारो रुपयांचा दंड, धाराशिव येथील घटना (HT_PRINT)

Dharashiv News : धाराशिव येथे एका महिला टेलरला एका महिलेचे ब्लाऊज वेळेवर शिवून न देणे चांगलेच महागात पडले आहे. पिडीत महिलेने थेट ग्राहकमंचाकडे धाव घेत या प्रकरणी दाद मागीतली. ग्राहक न्यायालयाने दोन्ही बाजू ऐकून टेलर महिलेला १५ हजार रुपयांचा दंड ठोठावला आहे. या सोबतच महिलेचे ब्लाऊज देखील मोफत शिवून देण्याचे आदेश दिले आहेत. या निर्णयाची चर्चा शहरात होत आहे.

काय आहे घटना ?

मिळालेल्या माहीतीनुसार स्वाती प्रशांत कस्तुरे नामक महिलेने शहरातील नेहा संत या टेलरिंगचे दुकान चालवणाऱ्या महिलेकडे ब्लाऊज शिवायला टाकले. या साठी स्वाती यांनी नेहा यांना ॲडव्हान्स पैसे देखील दिले. मात्र, ठरलेल्या वेळेत नेहा यांनी स्वाती यांना त्यांचे ब्लाऊज दिले नाहीत.

स्वाती प्रशांत कस्तुरे यांनी गेल्या वर्षी जानेवारी महिन्यात धाराशिव येथील नेहा संत यांना दोन वर्कचे ब्लाऊज शिवण्यासाठी दिले होते. या साठी त्यांनी त्यांना वेळ देखील दिली होती. तसेच कामाचे आगाऊ पैसे म्हणून त्यांनी एकूण ६ हजार ३०० रुपये बिलापैकी ३ हजार रुपये ॲडव्हान्स दिले. ठरलेल्या दिवशी स्वाती या नेहा संत यांच्याकडे जाऊन त्यांनी त्यांचे ब्लाऊज झाले की नाही या बाबत विचारणा केली. मात्र, त्यांना हे  ब्लाऊज वेळेवर शिवून मिळाले  नाही. फोन, मेसेजद्वारे पाठपुरावा केल्यानंतरही ब्लाऊज शिवून  न मिळाल्याने  स्वाती कस्तुरे यांनी २८ एप्रिल २०२३ रोजी ॲड.प्रशांत कस्तुरे यांच्यामार्फत नेहा संत यांच्या विरोधात ग्राहक तक्रार निवारण मंचात तक्रार दाखल केली. या तक्रार अर्जावर वर्षभरानंतर सुनावणी झाली.

दरम्यान, या प्रकरणी नेहा यांना नोटिस बजावण्यात आली होती. या नोटीसीवर १५ जुलै २०२४ रोजी सुनावणी झाली. मात्र, नेहा संत यांनी ग्राहक मंचाने बजावलेल्या नोटिसीला प्रतिसाद दिला नाही. या सुनावणीला नेहा गैरहजर राहिल्याने ग्राहक मंचाने एकतर्फी आदेश देत नेहा संत यांना १० हजार रुपयांचा दंड ठोठावला. व तक्रारीचा खर्च म्हणून ५ हजार रुपये स्वाती कस्तुरे यांना देण्याचा आदेश दिला. तर या सोबतच स्वाती यांना मोफत ब्लाउज शिवून देण्याचा आदेश देखील दिला आहे.

Whats_app_banner

संबंधित बातम्या

विभाग
महाराष्ट्रातील बातम्या, प्रत्येक घडामोडीची ब्रेकिंग न्यूज मिळवा हिंदुस्तान टाइम्स मराठीवर