Pune manchar Accident : मंचर जवळ कार-टेम्पो-कंटेनरच्या भीषण अपघातात कार मधील तिघे जळून ठार
मराठी बातम्या  /  महाराष्ट्र  /  Pune manchar Accident : मंचर जवळ कार-टेम्पो-कंटेनरच्या भीषण अपघातात कार मधील तिघे जळून ठार

Pune manchar Accident : मंचर जवळ कार-टेम्पो-कंटेनरच्या भीषण अपघातात कार मधील तिघे जळून ठार

Updated Feb 17, 2024 12:15 PM IST

Pune manchar Accident : पुणे जिल्ह्यातील आंबेगाव तालुक्यात आज सकाळी झालेल्या भीषण अपघातात कारमधील तिघे जण जळून ठार झाले.

Pune manchar Accident
Pune manchar Accident

Pune manchar Accident : पुण्यात आंबेगाव तालुक्यातिल मंचर जवळ भीषण अपघात झाला आहे. कार-टेम्पो-कंटेनरच्या विचित्र अपघात कार मधील तिघे जळून ठार झाले आहेत. ही घटना पुणे नाशिक राष्ट्रीय महामार्गावर मंचरच्या दक्षिण बाजूला तीन किलोमीटर अंतरावर भोररवाडी तांबडे मळा येथे सकाळी घडली. सुदैवाने स्विफ्ट करचा चालक व टेम्पोच्या चालक बचावला आहे.

Baramati loksabha : बारामतीत रंगणार नणंद भावजय यांच्यात मुकाबला! सुनेत्रा पवार-सुप्रिया सुळे दोघींचीही जोरदार तयारी

या अपघातात मृत्यूमुखी पडलेल्यांची नावे समजू शकली नाही. मात्र, हे मृत तीन तरुण खेड तालुक्यातील राक्षेवाडी येथीलअसल्याची माहिती आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार आज सकाळी एका स्विफ्ट कारमधून हे तीन तरुण पुणे नाशिक मार्गाने जात होते. यावेळी सकाळी मंचर जवळ त्यांची कार आली. यावेळी पुणे - नाशिक महामार्गावर पुण्याच्या दिशेने जाणारा एक कंटेनर (GJ ०१ WB १७३७) हा बंद अवस्थेत उभा होता. या कंटेनरला टेम्पो (MH १२ QG ३३५१) आणि स्विफ्ट कार (MH १५ DT ०२९५) जाऊन धडकले.

Pune manchar Accident
Pune manchar Accident

टेम्पो आणि कार पुढे जाऊन उभ्या असलेल्या कंटेनरला धडकले. ही धडक एवढी भीषण होती की स्विफ्ट गाडीने पेट घेतला. यात ही गाडी पूर्णजळून खाक झाली आहे. स्विफ्ट गाडीतील तीन प्रवाशांना बाहेर पडता न आल्याने त्यांचा होळपळून मृत्यू झाला. तर स्विफ्ट कारचा चालक व टेम्पो चालक या अपघातातून बचावले आहेत. मृत झालेल्यांची नावे समजू शकली नाही. अपघातातनंतर या परिसरात वाहतूक कोंडी झाली होती. पोलिसांनी घटनास्थळी येत वाहतूक कोंडी सोडवली. तसेच स्थानिक नागरिक आणि पोलिसांनी मिळून मृतांना कार बाहेर काढले. त्यांना जवळच्या रुग्णालयात पाठवण्यात आले आहे. या ठिकाणी शवविच्छेदन झाल्यावर मृतदेह कुटुंबीयांना दिले जाणार आहे. हा अपघात एवढा भयंकर होता की कार जळून खाक झाली आहे तर टेम्पोचा चक्काचूर झाला आहे.

मंचर पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक अरुण फुगे पोलीस उपनिरीक्षक सोमेश्वर शेटे पोलीस नाईक राजेंद्र हिले, नंदकुमार आढारी या आपघताबाबत कसून चौकशी करत आहेत.

Whats_app_banner

संबंधित बातम्या

विभाग
महाराष्ट्रातील बातम्या, प्रत्येक घडामोडीची ब्रेकिंग न्यूज मिळवा हिंदुस्तान टाइम्स मराठीवर