Mosquitoes problem in Mumbai : पुण्यात काही दिवसांपूर्वी डासांच्या थव्यावा व्हिडिओ व्हायरल झाला होता. दरम्यान, मुंबईकरांनी देखील डासांच्या हल्ल्याची धास्ती घेतली आहे. संध्याकाळ झाली की मोठ्या प्रमाणात डास हे घरात घुसून नागरिकांचे रक्त सोशत आहे. एवढेच नाही तर कार, रस्त्याने चालतांना देखील डासांच्या हल्ल्यामुळे नागरिक हैराण झाले आहे. नगरिकांनी घरात, खिडक्यांना अनेक सुरक्षा कवच लावले असले तरी हे भेदून डास घरात घुसत आहे. दरम्यान, यामुळे मुंबईकरांचे आरोग्य मात्र, धोक्यात आले आहे. महागर पालिकेचे अधिकारी डास प्रतिबंधक औषध फवारत असूनही त्याचा काही उपयोग होत नाही.
बृहन्मुंबई महानगरपालिकेच्या (BMC) अधिकाऱ्यांनी सांगितले की जानेवारी आणि फेब्रुवारी हे महिने क्युलेक्स डासांच्या प्रजननाचा काळ असतो. या डासांना उपद्रवी डास म्हणून ओळखले जाते. उपनगरातील उघड्या नाल्यांमध्ये टाकण्यात येणारा कचरा, बेकायदेशीर सोडण्यात येणारे सांडपाणी आणि स्टॉर्म वॉटर ड्रेन (SWDs) मध्ये साचलेले पाणी यामुळे यांची पैदास वाढते. सध्या हे उपद्रवी डास मुंबईकरांना त्रास देत आहेत.
मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या आदेशाचे पालन करून, शहरात स्वच्छता मोहीम राबवली जात आहे. यात फॉगिंग, कचरा आणि बेकायदेशीर बॅनर हटवणे, सार्वजनिक स्वच्छतागृहे साफ करणे आदी बाबींचा समावेश आहे. मात्र, या बाबी रोजच्या रोज होतांना दिसत नाही.
मुंबईत अनेक रस्त्यांची कामे सुरू आहे. या साठी रस्त्यावर लोखंडी पाण्याच्या टाकीत पाणी साठवले जात आहे. या पण्यातही या दासांची पैसदास होत आहे. क्युलेक्स डासांमुळे सध्या मुंबईत कोणताही आजार पसरला नसला तरी भविष्यात यामुले मोठे आजार पसारण्याची शक्यता नाकारता येत नाही.
धारावीमध्ये हा त्रास सर्वाधिक आहे. यामुळे रहिवाशांना घराबाहेर पडणेही कठीण झाले आहे. घरात मच्छर अगरबत्ती, डास प्रतिबंधक अगरबत्ती, ज्यूटच्या पिशव्या आणि घरात धूर करून देखील या दासांचा उपद्रव कमी झालेला नाही.
महापाळीकेचे कीटक नियंत्रण अधिकारी खान म्हणले, बीएमसीने केलेले सर्व फॉगिंग कीटकांवर मात करण्यासाठी अपुरे आहे. डासांची पैदास थांबवण्यासाठी परिसरात स्वच्छता राखणे आवश्यक आहे. हे काम बीएमसीचे असल्याचे मी जेव्हा सांगितले तेव्हा महापलिकेच्या काही अधियऱ्यांनी जबाबदारी झटकली असेही खान म्हणाले.
खान म्हणाले, मुंबईत साफसफाईची पाहणी करण्यासाठी मुख्यमंत्र्यांनी धारावीला भेट दिली तेव्हा त्यांच्या भागात स्वच्छता मोहिमेचा कोणताही परिणाम दिसला नाही.
दुसरीकडे, प्रत्येक वॉर्डात डासांच्या त्रासाबाबत नागरिकांच्या तक्रारींमुळे पालिका अधिकारी देखील वैतागून गेले आहेत. एका अधिकाऱ्याने बीकेसी आणि खेरवाडीमध्ये उघड्या नाल्यामुळे ही समस्या वाढल्याचे स्पष्ट केले. तसेच यावर मात करण्यासाठी अधिकारी बीकेसी भागात सुट्टीच्या दिवशी काम करत असल्याचे त्यांनी सांगितले.
तर दुसऱ्या एका वॉर्ड अधिकाऱ्याने सांगितले, “आमच्याकडे दररोज सर्व ठिकाणी सेवा देण्यासाठी पुरेसे कर्मचारी नाहीत. संपूर्ण शहरात रस्त्यांच्या काँक्रिटीकरणाचे काम सुरू आहे. रस्त्याचे काँक्रिटीकरण होण्यापूर्वी, स्टॉर्म वॉटर ड्रेनची पुनर्बांधणी केली जाते आणि त्यासाठी बीएमसीचे कंत्राटदार बंधारा बांधून पाणी अडवत आहेत. या पाण्यातही सांडपाणी मिसळत असल्याने डासांचा प्रादुर्भाव वाढत आहे.
संबंधित बातम्या