पुण्यात मच्छरांचे वावटळ पाहून नागरिकांना मोठा धक्का बसला आहे. मच्छरांच्या वावटळाचा व्हिडिओ सोशल मीडियावर धुमाकूळ घालत आहे. 'बीइंग पुणे ऑफिशियल' या इन्स्टाग्राम हँडलवरून या विचित्र घटनेचा व्हिडिओ इन्स्टाग्रामवर शेअर करण्यात आला आहे.
या व्हिडिओमध्ये नदीकाठावर डासांचे वावटळ दिसत आहे. हा व्हिडिओ पाहून अनेकांना त्यांच्या डोळ्यावर विश्वास बसेना. काही लोकांनी तर याला 'धोकादायक' असेही म्हटले आहे. या व्हिडिओच्या कॅप्शनमध्ये नदी, केशवनगर, खराडी येथे डासांचा वावटळ असे लिहिण्यात आले आहे.
हा व्हिडिओ दोन दिवसांपूर्वी इन्स्टाग्रामवर शेअर करण्यात आला. तेव्हापासून या व्हिडिओला ४५ लाखांहून अधिक व्ह्यूज मिळाले आहेत. या व्हिडिओवर लाईक्स आणि कमेंटचा वर्षाव सुरु आहे.
हा व्हिडिओ पाहिल्यानंतर एका युजरने कमेंटमध्ये असे म्हटले आहे की, मनपाने त्यांच्या रिव्हरफ्रंट आणि नदी स्वच्छता प्रकल्पाला गती द्यावी. दुसऱ्याने हे खूप धोकादायक दिसत आहे, अशी कमेंट केली आहे. तर, अस्वच्छतेमुळे नागरिकांचे आरोग्य धोक्यात आहे, अशी कमेंट एका युजरने म्हटले आहे.
संबंधित बातम्या