डोक्यावर दुपट्टा घेऊन स्वरा भास्कर पोहोचली मौलाना सज्जाद नोमानी यांच्या भेटीला, सोशल मीडियातून टीकेची झोड
मराठी बातम्या  /  महाराष्ट्र  /  डोक्यावर दुपट्टा घेऊन स्वरा भास्कर पोहोचली मौलाना सज्जाद नोमानी यांच्या भेटीला, सोशल मीडियातून टीकेची झोड

डोक्यावर दुपट्टा घेऊन स्वरा भास्कर पोहोचली मौलाना सज्जाद नोमानी यांच्या भेटीला, सोशल मीडियातून टीकेची झोड

Nov 18, 2024 10:23 AM IST

Swara Bhasker meets maulana sajjad nomani : महाविकास आघाडीकडून निवडणूक लढणाऱ्या पतीसोबत स्वरा भास्कर हिनं मौलाना सज्जाद नोमानी यांची भेट घेतल्यानं ती वादात अडकली आहे.

अभिनेत्री स्वरा भास्कर हिनं घेतली मौलाना सज्जाद नोमानी यांची भेट, सोशल मीडियातून टीकेची झोड
अभिनेत्री स्वरा भास्कर हिनं घेतली मौलाना सज्जाद नोमानी यांची भेट, सोशल मीडियातून टीकेची झोड

Swara Bhasker Marathi news : विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर अभिनेत्री स्वरा भास्कर हिनं पती फहाद अहमद यांच्यासह वादग्रस्त मुस्लिम धर्मगुरू मौलाना सज्जाद नोमानी यांची भेट घेतली. यावेळी तिनं विशिष्ट प्रकारचा पेहराव केला होता. या भेटीवरून सोशल मीडियात स्वरा भास्कर हिच्यावर टीकेची झोड उठली आहे.

स्वरा भास्कर हिचे पती फहाद अहमद हे मुंबईतील अणुशक्तीनगर मतदारसंघातून शरद पवार यांच्या राष्ट्रवादी काँग्रेसच्या तिकिटावर निवडणूक लढवत आहेत. त्यांच्यासमोर माजी मंत्री नवाब मलिक यांची कन्या सना मलिक हिचं आव्हान आहे. दोन्ही उमेदवारांनी भेटीगाठींचा सपाटा लावला आहे. याच पार्श्वभूमीवर स्वरा भास्कर ही नोमानी यांना भेटली. फहाद यांनी या भेटीचे फोटो सोशल मीडियावर शेअर केले आहेत. फोटोमध्ये स्वरा भास्कर इस्लामी रीतीरिवाजानुसार दुपट्ट्यानं डोके झाकून पेस्टल सलवार सूटमध्ये दिसत आहे. 

मौलाना नोमानी हे महिला शिक्षणाचे विरोधक म्हणून ओळखले जातात. पालकांनी आपल्या मुलींना विनाकारण शाळा किंवा महाविद्यालयात पाठविणं हराम आहे, असं ते म्हणतात. त्यामुळं या भेटीनंतर लोकांनी स्वरा भास्करवर ढोंगीपणाचा आरोप केला आहे.

नेटकरी म्हणतात…

एका युजरनं कमेंट केली की, अल्ट्रा फेमिनिस्ट स्वरा भास्करला देवबंदी समर्थक तालिबान समर्थक मूलतत्त्ववादी मौलाना सज्जाद नोमानी यांचा आशीर्वाद मिळाला. हे नोमानी अनेकदा पालकांना मुलींना 'काफिर' होऊ नये म्हणून शिक्षण संस्थांमध्ये पाठवू नका, असा उपदेश करत असतात. आंतरधर्मीय (मुस्लीम मुलगी आणि हिंदू मुलगा) विवाहाच्या विरोधात उघडपणे बोलतात. आंतरधर्मीय विवाह करणाऱ्या स्वरा भास्करला त्यांची मतं मान्य आहेत का? तिला दुसरा पर्याय नाही. हा पंथ तेवढं स्वातंत्र्य देत नाही', असं एका नेटकऱ्यानं म्हटलं आहे. 

एका युजरनं स्वराच्या दुटप्पीपणावर टीका केली आहे. एक दिवस ब्राह्मणी पितृसत्ता मोडून काढा असं म्हणायचं आणि दुसऱ्या दिवशी मुल्लामौलवींसमोर लोटांगण घालायचं, असं त्यानं म्हटलं आहे.

काही युजर्सनी स्वराच्या दिसण्याची खिल्ली उडवली आहे. एकाने लिहिलं आहे की, 'इस्लाममध्ये मेकअप हराम आहे. स्वरा भास्कर योग्य मार्गावर आहे.

एका नेटिझननं फहाद अहमद याच्यावर निशाणा साधला आहे. 'नोमानी हा तोच माणूस आहे ज्यानं व्होट जिहादची भाषा केली आणि महाविकास आघाडीला पाठिंबा न देणाऱ्यांवर बहिष्कार टाकण्याचं आवाहन केलं, याकडं त्यानं लक्ष वेधलं आहे.स्वरा भास्कर आणि फहाद चे वैयक्तिक आयुष्य

स्वरा भास्कर आणि फहाद अहमद यांनी फेब्रुवारी 2023 मध्ये स्पेशल मॅरेज अॅक्टअंतर्गत लग्न केले होते. त्याच वर्षाच्या अखेरीस, त्यांनी त्यांची मुलगी राबियाचे स्वागत केले.

स्वरा भास्कर आणि फहाद अहमद यांनी फेब्रुवारी २०२३ मध्ये स्पेशल मॅरेज अ‍ॅक्ट अंतर्गत लग्न केलं होतं. त्याच वर्षाच्या अखेरीस त्यांनी मुलीला जन्म दिला. ते दोघेही एकाच विचारांचे असून विविध सामाजिक आंदोलनात एकत्र दिसतात.

महाराष्ट्र विधानसभेच्या २८८ जागांसाठी येत्या २० नोव्हेंबर रोजी मतदान होणार असून निकाल २३ नोव्हेंबरला जाहीर होणार आहे. राज्यात महाविकास आघाडी आणि सत्ताधारी महायुतीमध्ये जोरदार लढत आहे.

Whats_app_banner
महाराष्ट्रातील बातम्या, प्रत्येक घडामोडीची ब्रेकिंग न्यूज मिळवा हिंदुस्तान टाइम्स मराठीवर