अजित पवारांच्या एंट्रीनंतर महायुतीतील विसंवाद वाढल्याच्या बातम्या अनेकदा बाहेर येत असतात. त्यातच लोकसभेच्या जागावाटपावरून सत्ताधाऱ्यांमध्ये मतभेद असल्याचे बोलले जात सताना शिवसेना उपनेत्यासुषमा अंधारे यांनी एक व्हिडिओ शेअर करत महायुतीतील दाटीवाटीवर खोचक टिप्पणी केली आहे.
शिवसेनेचे आमदार मंत्रिपदासाठी गुडघ्याला बांशिंग बांधून तयार होते. मात्र, अचानक अजित पवार गटाची एन्ट्री झाली अन् राष्ट्रवादीच्या ९ आमदारांना मंत्रीपदाची लॉटरी लागली. तेव्हापासून शिवसेनेचे आमदार मंत्रिपदासाठी वेटींग लिस्टमध्येच अडकून पडले आहेत. आता लोकसभा निवडणूक तोंडावर आल्याने मंत्रिमंडळ विस्तार होण्याची शक्यता नाही. यातच महायुतीत अंतर्गत वाद वाढला आहे.
या पार्श्वभूमीवर शिवसेना उपनेत्या सुषमा अंधारे यांनी एक व्हिडिओ शेअर केला आहे. त्यामध्ये, एकाच कारमध्ये दाटीवाटीने मुख्यमंत्री शिंदे, फडणवीस व अजित पवार हे २ उपमुख्यमंत्री आणि मंत्री गिरीश महाजन तसेच भाजपा प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे बसल्याचं दिसत आहे. यावरून सुषमा अंधारे यांनी खोचक टोला लगावला आहे.
जर केली नसती सुरत-गुवाहाटी तर कशाला झाली असती दाटीवाटी..! असे कॅप्शन सुषमा अंधारे यांनी या व्हिडिओसोबत लिहिले आहे.
सोशल मीडियावर हा व्हिडिओव्हायरल होत असूनएकाच गाडीत मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री अजित पवार, मंत्री गिरीश महाजन आणि भाजपा प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे दाटीवाटीने बसल्याचंदिसून येत आहे.