Sushma Andhare : “..चुका दुरुस्त होऊ शकतात”, रक्षाबंधन निमित्त सुषमा अंधारेंची खास पोस्ट; नेमका रोख कुणाकडे?-sushma andhare post on social media on the occasion of rakshabandhan ,महाराष्ट्र बातम्या
मराठी बातम्या  /  महाराष्ट्र  /  Sushma Andhare : “..चुका दुरुस्त होऊ शकतात”, रक्षाबंधन निमित्त सुषमा अंधारेंची खास पोस्ट; नेमका रोख कुणाकडे?

Sushma Andhare : “..चुका दुरुस्त होऊ शकतात”, रक्षाबंधन निमित्त सुषमा अंधारेंची खास पोस्ट; नेमका रोख कुणाकडे?

Aug 29, 2023 04:55 PM IST

SushmaAndhare : सुषमा अंधारे यांनी उद्या रक्षाबंधनांच्या पार्श्वभूमीवर खास पोस्ट लिहिली आहे. वाट चुकलेल्या भावांना सन्मार्गाचा रस्ता सापडो याच सदिच्छा,असं सुषमा अंधारे म्हणाल्या आहेत.

Sushma Andhare
Sushma Andhare

शिवसेनेत बंडखोरी झाल्यापासून शिवसेना ठाकरे गटाच्या उपनेत्या सुषमा अंधारे यांनी आपल्या भाषणातून बंडखोरी केलेल्या नेत्यांवर जोरदार हल्लाबोल केला. शिवसेना फुटीनंतर तळागाळातील, चळवळीतील अनेक नेते ठाकरे गटात सामील झाले. अंधारे यांनी शिंदे गटासह सत्ताधाऱ्यांविरोधात सातत्याने आवाज उठवला आहे. आता सुषमा अंधारे यांनी उद्या रक्षाबंधनांच्या पार्श्वभूमीवर खास पोस्ट लिहिली आहे.

वाट चुकलेल्या भावांना सन्मार्गाचा रस्ता सापडो याच सदिच्छा,असं सुषमा अंधारे म्हणाल्या आहेत. दरम्यान, या पोस्टमध्ये त्यांनी शिंदे गटाचा स्पष्ट उल्लेख केलेला नसला तरीही त्यांच्याचसाठी ही पोस्ट असल्याची चर्चा राजकीय वर्तुळात रंगली आहे.

अंधारे यांनी लिहिले आहे की, उद्या राखी पौर्णिमा आणि कुठल्याही बहिणीला भाऊ राखी पौर्णिमेला सोबत असावा असं मनापासून वाटतं. महाराष्ट्रभर महाप्रबोधन यात्रा करताना आम्ही विरोधक म्हणून भूमिका न मांडता भाऊ म्हणून भूमिका मांडत राहिलो. कारण यातल्या काहींनी निश्चितपणे अक्षम्य असा अपराध केला आहे.  पण काहींच्या हातून नकळत चुका घडल्या आहेत आणि चुका दुरुस्त होऊ शकतात, असं अंधारे म्हणाल्या.

त्याचबरोबर “आमच्या सगळ्याच भावंडांना राखी पौर्णिमेच्या खूप खूप शुभेच्छा. वाट चुकलेल्या भावना सन्मार्गाचा रस्ता सापडो हिच सदिच्छा”, असंही त्या म्हणाल्या.

 

Whats_app_banner