तुम्हाला भांडी घासायलाही बोलावलं नाही का? अंबानींच्या लग्नातील तेजस ठाकरे यांच्या डान्सवरून सुषमा अंधारेंचा तिखट पलटवार
मराठी बातम्या  /  महाराष्ट्र  /  तुम्हाला भांडी घासायलाही बोलावलं नाही का? अंबानींच्या लग्नातील तेजस ठाकरे यांच्या डान्सवरून सुषमा अंधारेंचा तिखट पलटवार

तुम्हाला भांडी घासायलाही बोलावलं नाही का? अंबानींच्या लग्नातील तेजस ठाकरे यांच्या डान्सवरून सुषमा अंधारेंचा तिखट पलटवार

Updated Jul 10, 2024 06:24 PM IST

Sushma andhanre : अंबानींच्या लग्नसोहळ्यात नृत्य करताना तेजसचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाला असून यावरून भाजप नेत्यांनी ठाकरे कुटूंबीय व शिवसेनेला टार्गेट केले आहे. याला आता ठाकरे गटाच्या प्रवक्त्या सुषमा अंधारे यांनी जोरदार पलटवार केला आहे.

तेजस ठाकरेंच्या डान्सवरुन सुषमा अंधारेंचा तिखट पलटवार
तेजस ठाकरेंच्या डान्सवरुन सुषमा अंधारेंचा तिखट पलटवार

देशातील प्रसिद्ध उद्योगपती मुकेश अंबानी यांचा लहान मुलगा अनंत अंबानी व राधिका मर्चंट यांचा विवाहाची धामधूम सुरु आहे. याचे विधी गेल्या आठवड्यापासून सुरू झाले आहे. यानिमित्त मुंबईतील अँटिलिया या निवासस्थानी तसेच जिओ वर्ल्ड सेंटरवर सेलिब्रिटींसह विविध क्षेत्रातील मान्यवरांची मांदियाळी पाहायला मिळत आहेत. अंबानींच्या संगीत समारंभात शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांचा मुलगा तेजस ठाकरेही उपस्थित होता. या लग्नसोहळ्यात नृत्य करताना तेजसचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाला असून यावरून भाजप नेत्यांनी ठाकरे कुटूंबीय व शिवसेनेला टार्गेट केले आहे. याला आता ठाकरे गटाच्या प्रवक्त्या सुषमा अंधारे यांनी जोरदार पलटवार केला आहे. अंधारे यांनी भाजप मुंबईचे अध्यक्षआशिष शेलार यांना टोला लगावला आहे.

अनंत अंबानींच्या लग्नातील डान्स सोहळ्यात तेजस ठाकरे डान्स करताना दिसून आले. त्यांचा हा व्हिडिओ समाजमाध्यमांवर व्हायरल झाल्यानंतर भाजप नेत्यांनी मराठी अस्मिता, मराठी-गुजराती वाद आदीचा उल्लेख करत टीकेची संधी साधली.भाजप नेते आशिष शेलार यांनी ट्विट करत म्हटले की, जो मराठी तरुण "गोविंदा रे गोपाळा"म्हणत दहीहंडीत नाचताना कधी दिसला नाही..ज्याचे पाय कधी गणेशोत्सवाच्या मिरवणूकीत थिरकले नाहीत,जो होळीला "आयना का बायना.." म्हणताना कधी दिसला नाही "गणा धाव रे... मला पाव रे.." म्हणत जाखडी नृत्यात कधी त्याने कोकणी ठेका धरला नाही..तो महाराष्ट्राचा उमदा तरुण चेहरा अंबानींच्या लग्नात शेवटच्या रांगेत उभे राहून नाचताना दिसला...!हा भन्नाट नृत्य अविष्कार पाहूनमहाराष्ट्रातील तमाम मराठी माणसाच्या काळजात "धकधक" झाले.

आशिष शेलार यांच्या खोचक टीकेला शिवसेना ठाकरे समर्थकांनीही अमृता फडणवीसांचे नाव घेत पलटवार केला होता. आता, सुषमा अंधारे यांनीही ट्विट करुन आशिष शेलार यांच्यावर तिखट प्रहार केला आहे.

तोरणादारी/मरणादारी वैर मनात ठेवू नये म्हणतात असो हे समजायला संस्कार लागतात. ज्याची तुमच्याकडे वानवा आहे.अमृताहिनी जशा राजकारणात नाहीत. त्यांना वैयक्तिक आयुष्य जगण्याचा अधिकार आहे तसंच आहे ते. बाय द वे तुम्हाला भांडी घासायलाही बोलावलं नाही का? असा सवाल अंधारे यांनी आशिष शेलार यांना टॅग करुन विचारला आहे. अंबानी कुटूंबाच्या लग्नामुळे भाजपा-शिवसेनेत आणखी शाब्दिक खडाजंगी होण्याची शक्यता आहे.

Whats_app_banner

संबंधित बातम्या