सोलापुरात वेगळंच राजकारण! प्रणिती शिंदे यांचा अपक्ष उमेदवाराला पाठिंबा; ठाकरेंच्या शिवसेनेला धक्का
मराठी बातम्या  /  महाराष्ट्र  /  सोलापुरात वेगळंच राजकारण! प्रणिती शिंदे यांचा अपक्ष उमेदवाराला पाठिंबा; ठाकरेंच्या शिवसेनेला धक्का

सोलापुरात वेगळंच राजकारण! प्रणिती शिंदे यांचा अपक्ष उमेदवाराला पाठिंबा; ठाकरेंच्या शिवसेनेला धक्का

Nov 20, 2024 03:04 PM IST

Solapur politics : महाराष्ट्रात विधानसभा निवडणुकीच्या मतदानात मोठी उलथापालथ झाली आहे. काँग्रेसचे ज्येष्ठ नेते सुशीलकुमार शिंदे आणि त्यांची कन्या प्रणिती शिंदे यांनी सोलापूर दक्षिण मतदारसंघातील अपक्ष उमेदवार धर्मराज कडाडी यांना पाठिंबा दिला आहे. यामुळे उद्धव ठाकरे गटाला धक्का बसला आहे.

महाविकास आघाडीत बिघाडी! सोलापुरात शिंदे यांचा अपक्ष उमेदवाराला पाठिंबा! उद्धव ठाकरे गटाला मोठा धक्का
महाविकास आघाडीत बिघाडी! सोलापुरात शिंदे यांचा अपक्ष उमेदवाराला पाठिंबा! उद्धव ठाकरे गटाला मोठा धक्का

Solapur Politics : राज्यात आज विधानसभेसाठी मतदान होत आहे. सकाळी ७ पासून मतदानाला सुरवात झाली आहे. मात्र, सकाळपासून अनेक नाट्यमय घडामोडी राज्यात पाहायला मिळत आहे. सोलापूरमध्ये काँग्रेसने उद्धव ठाकरे गटाशी दगाफटका केला आहे. सोलापूर दक्षिणमध्ये काँग्रेसने ठाकरे गटाच्या अमर पाटील यांच्या ऐवजी अपक्ष उमेदवार धर्मराज काडादी यांना पाठिंबा दिल्याने महाविकास आघाडीमध्ये आता बिघाडी झाली आहे. शिवसेना ठाकरे गटाकडून खासदार प्रणिती शिंदे व माजी मुख्यमंत्री सुशीलकुमार शिंदे यांच्यावर शिवसेना ठाकरे गटाचे उपनेते शरद कोळी यांनी सडकून टीका केली आहे. प्रणिती शिंदे या भाजपची बी टीम असल्याचा आरोप त्यांनी केला आहे.

महाराष्ट्रात विधानसभा निवडणुकीच्या मतदानाच्या दिवशी सोलपुरात मोठी राजकीय उलथापालथ झाली आहे. काँग्रेसचे ज्येष्ठ नेते सुशीलकुमार शिंदे आणि त्यांची कन्या प्रणिती शिंदे यांनी सोलापूर दक्षिण मतदारसंघातील अपक्ष उमेदवार धर्मराज कडादी यांना पाठिंबा दिला आहे. काँग्रेससोबत महाविकास आघाडीत सहभागी असलेल्या उद्धव ठाकरे यांच्या शिवसेनेला ही जागा देण्यात आली होती. या ठिकाणी उद्धव ठाकरे यांनी उमेदवार उभा केला आहे. आघाडी धर्म पाळून या उमेदवाराला पाठिंबा देण्याऐवजी सुशीलकुमार शिंदे यांनी अपक्ष उमेदवाराला पाठिंबा दिल्याने त्यांच्या या निर्णयाने सर्वांनाच आश्चर्याचा धक्का बसला आहे. अपक्ष उमेदवाराला पाठिंबा दिल्याने काय परिणाम होणार या कडे सर्वांचे लक्ष लागले आहे. सुशीलकुमार शिंदे मतदानासाठी आले होते. मतदान करून बूथबाहेर आल्यावर सुशीलकुमार शिंदे यांनी अपक्ष उमेदवाराला पाठिंबा जाहीर केला.

सुशीलकुमार शिंदे म्हणाले, धर्मराज कडादी हे चांगले उमेदवार असून ते मतदारसंघाच्या विकासासाठी प्रयत्न करतील. सुरुवातीला दिलीप माने यांना काँग्रेसकडून संधी मिळेल असे वाटत होते, पण त्यांना एबी फॉर्म मिळाला नाही. अशा परिस्थितीत आम्ही आता धर्मराजला कडादी यांना पाठिंबा देण्याचा निर्णय घेतला आहे. यापूर्वी शिंदे यांनी ही जागा उद्धव सेनेला दिल्याबद्दल आश्चर्य व्यक्त केलं होतं. शिंदे म्हणाले या ठिकाणी कॉंग्रेसचा भक्कम जनाधार आहे. अशा तऱ्हेने उद्धव ठाकरे यांना ही जगा मिळणे चुकीचे होते.

माजी गृहमंत्री सुशीलकुमार शिंदे म्हणाले, 'हा भाग काँग्रेसचा बालेकिल्ला आहे. मी इथून निवडून आलो आहे आणि मला महाराष्ट्राचा मुख्यमंत्री म्हणून काम करण्याची संधी मिळाली आहे. शिवसेनेने घाईघाईने अमर पाटील यांना येथून उमेदवारी जाहीर केली. ते या जागेवर दावा करू शकत नाही. काँग्रेसने सातत्याने ही जागा राखली आहे आणि जिंकली देखील आहे. अशा परिस्थितीत ही जागा शिवसेनेला देणे समजण्यापलीकडचे आहे. प्रणिती शिंदे यांनी देखील त्यांच्या वडिलांच्या भूमिकेला पाठिंबा जाहीर केला.

शिंदे म्हणाले, सोलापूर दक्षिण मतदारसंघ ऐतिहासिकदृष्ट्या काँग्रेसकडे राहिला आहे. प्रणिती शिंदे म्हणल्या, हा मतदार संघ काँग्रेसचा बालेकिल्ला आहे आणि सुशील कुमार शिंदे हे देखील येथून विजयी झाले आहेत. आतापर्यंत आम्ही आघाडी धर्माचे आचरण करत होतो. पण इथे पंढरपूरसारखी मैत्रीपूर्ण लढत शक्य नव्हती. अशा परिस्थितीत आम्ही अपक्ष उमेदवाराला पाठिंबा देण्याचा निर्णय घेतला.

प्रणिती शिंदे या भाजपच्या बी टीम, त्यांनी केसाने गळा कापला : शरद कोळी यांचा आरोप

यावेळी उद्धव ठाकरे गटाचे शरद कोळी यांनी सुशील कुमार शिंदे आणि प्रणिती शिंदे यांच्यावर गंभीर आरोप केले. दोघेही बाप लेक हे भाजपची बी टीम असल्याचे कोळी म्हणाले. शिंदे यांनी भाजपसोबत आतून हातमिळवणी केली आहे. मात्र, शिंदे कुटुंबाची ही शेवटची खासदारकी असून यापुढे तुम्हाला खासदारकी मिळणार नाही, असा इशारा कोळी यांनी शिंदे यांना दिला आहे.

 

Whats_app_banner
महाराष्ट्रातील बातम्या, प्रत्येक घडामोडीची ब्रेकिंग न्यूज मिळवा हिंदुस्तान टाइम्स मराठीवर