Man Kills Daughter: स्वयंपाकाला उशीर झाल्यानं पोटच्या मुलीवर कुकरनं हल्ला, उपचारादरम्यान मृत्यू!
मराठी बातम्या  /  महाराष्ट्र  /  Man Kills Daughter: स्वयंपाकाला उशीर झाल्यानं पोटच्या मुलीवर कुकरनं हल्ला, उपचारादरम्यान मृत्यू!

Man Kills Daughter: स्वयंपाकाला उशीर झाल्यानं पोटच्या मुलीवर कुकरनं हल्ला, उपचारादरम्यान मृत्यू!

Nov 30, 2024 09:28 PM IST

Teenager Dies After Father Attacks Her: गुजरातच्या सुरतमध्ये स्वयंपाकाला उशीर झाला म्हणून एका व्यक्तीने पोटच्या मुलीची हत्या केली आहे.

स्वयंपाकाला उशीर झाल्यानं पोटच्या मुलीवर कुकरनं हल्ला
स्वयंपाकाला उशीर झाल्यानं पोटच्या मुलीवर कुकरनं हल्ला

Gujarat Man Kills Daughter: गुजरातमधील सुरतमध्ये एक धक्कादायक घटना घडली. स्वयंपाक आणि घरातील अपूर्ण राहिलेल्या कामांमुळे एका व्यक्तीने पोटच्या मुलीवर प्रेशर कुकरने हल्ला करून तिची हत्या केली. घरात कोणी नसताना ही घटना घडली. याप्रकरणी आरोपी पित्याला अटक करण्यात आली. या घटनेने परिसरात एकच खळबळ माजली असून याप्रकरणी पोलीस अधिक तपास करीत आहेत.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, मुकेश परमार (वय, ४०) असे अटक करण्यात आलेल्या आरोपीचे नाव असून तो सुरत येथील रहिवासी आहे. तर, हेताली परमार (वय, १८) असे मृत तरुणीचे नाव आहे. घरातील अपूर्ण कामावरून मुकेश आणि हेताली यांच्यात वाद झाला. या वादातून मुकेशने हेतालीची हत्या केली. ही घटना गुरुवारी दुपारी दीड वाजताच्या सुमारास घडली.

हेताली आपल्या कुटुंबासह सुरतमधील भरीमाता रोडवरील एसएमसी सुमन मंगल सोसायटीत वास्तव्यास होती. दरम्यान, घटनेच्या दिवशी मुकेश कामाला गेला नव्हता आणि तो घरातच होता. तर, हेताली हिची आई गीता आणि मोठी बहीण कामावर गेल्या होत्या. तिचे दोन्ही लहान भाऊ देखील घरी नव्हते. कामावर जाताना गीताने हेताली स्वयंपाक आणि घरातील कामे आवरून ठेवण्यास सांगितले. यावरून मुकेश आणि हेताली यांच्यात बाचाबाची झाली. यानंतर रागातून मुकेशने हेतालीच्या डोक्यात कुकरने हल्ला केला. या हल्ल्यात हेताली गंभीर जखमी झाली. तिला ताबडतोब स्मिमर रुग्णालयात दाखल करण्यात आले. मात्र, शुक्रवारी पहाटे उपचारादरम्यान तिचा मृत्यू झाला.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, हेताली ही डायमंड युनिटमध्ये काम करत होती. मात्र, सुट्टीमुळे ती घरीच होती. तिची आई एका मॉलमध्ये काम करते. तर. तिची मोठी बहीण लॉजिस्टिक युनिटमध्ये काम करते. मुकेश भाड्याने ऑटोरिक्षा चालवायचा. मात्र आजारी असल्यामुळे तो गेल्या आठ दिवसांपासून घरीच होता. या घटनेनंतर पोलिसांनी त्याला अटक केली असून पुढील चौकशीला सुरुवात केली आहे. या घटनेने परिसरात एकच खळबळ माजली आहे.

Whats_app_banner
महाराष्ट्रातील बातम्या, प्रत्येक घडामोडीची ब्रेकिंग न्यूज मिळवा हिंदुस्तान टाइम्स मराठीवर