मराठी बातम्या  /  महाराष्ट्र  /  patrachal scam : “..तर मला अमित शहांशी चर्चा करावी लागेल” भातखळकरांवर सुप्रिया सुळेंचा पलटवार

patrachal scam : “..तर मला अमित शहांशी चर्चा करावी लागेल” भातखळकरांवर सुप्रिया सुळेंचा पलटवार

Shrikant Ashok Londhe HT Marathi
Sep 20, 2022 11:13 PM IST

ईडीने न्यायालयात दाखल केलेल्या आरोपपत्रात शरद पवारांचं नाव आहे,हे अतुल भातखळकरांना कसं कळालं?ईडीची कागदपत्रे अशा प्रकारे लीक होत असतील,तर हा राष्ट्रीय सुरक्षेचा प्रश्न आहे,अशी प्रतिक्रिया सुप्रिया सुळे यांनी दिली आहे

भातखळकरांवर सुप्रिया सुळेंचा पलटवार
भातखळकरांवर सुप्रिया सुळेंचा पलटवार

patrachal scam: मुंबईतील पत्राचाळ घोटाळ्याप्रकरणी सक्तवसुली संचालनालयाने (ईडी) विशेष न्यायालयात शिवसेना खासदार संजय राऊत यांच्याविरुद्ध आरोपपत्र दाखल केले आहे. या आरोपपत्रात राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांचेही नाव असल्याचा गौप्यस्फोट भाजप आमदार अतुल भातखळकर यांनी करत या प्रकरणाची चौकशी करण्याची मागणी गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे पत्र लिहून केली आहे.

यावर आता राष्ट्रवादीच्या खासदार सुप्रिया सुळे यांनी अतुळ भातखळकर यांच्यावर पलटवार केला आहे. ईडीने न्यायालयात दाखल केलेल्या आरोपपत्रात शरद पवारांचं नाव आहे,हे अतुल भातखळकरांना कसं कळालं? ईडीची कागदपत्रे अशा प्रकारे लीक होत असतील, तर हा राष्ट्रीय सुरक्षेचा प्रश्न आहे, अशी प्रतिक्रिया सुप्रिया सुळे यांनी दिली आहे.  त्या मुंबईत प्रसारमाध्यमांशी बोलत होत्या.

पत्राचाळ घोटाळ्याप्रकरणी ईडीकडून दाखल केलेल्या आरोपपत्राबाबत विचारलं असता सुप्रिया सुळे म्हणाल्या की, ईडीकडून पेपर लीक होत असेल,तर मला दिल्लीला जाऊन केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांच्याशी चर्चा करावी लागेल. कारण ईडीची कागदपत्रे काही लोकांकडे लीक होत असतील तर हा राष्ट्रीय सुरक्षेचा प्रश्न आहे.

मी केंद्रीय गृहमंत्री अमित शाहांना अतिशय विनम्रपणे विनंती करते की,त्यांनी याबाबतची चौकशी लावावी. ईडीचे कागदपत्रे अशाप्रकारे लीक होणं देशासाठी हानिकारक आहे. हा देशाच्या सुरक्षेचा प्रश्न आहे. त्यामुळे मी अमित शाहांकडे न्याय मागणार आहे. कारण मला देशाची काळजी आहे, अशी प्रतिक्रिया सुप्रिया सुळे यांनी दिली आहे.

खासदार संजय राऊत मागील काही दिवसांपासून ईडीच्या न्यायालयीन कोठडीत आहेत. न्यायालयीन कोठडी संपल्यानंतर त्यांना सोमवारी पुन्हा न्यायालयात हजर करण्यात आलं होतं. यानंतर न्यायालयाने पुन्हा राऊतांच्या न्यायालयीन कोठडीत वाढ केली.

IPL_Entry_Point

संबंधित बातम्या