महिला आरक्षण विधेयकावर आज संसदेत चर्चा सुरू आहे. या विधेयकावर लोकसभेत चर्चा सुरू असून विविध पक्षातील नेत्यांनी यावर आपली मते मांडली आहेत. काँग्रेस नेत्या सोनिया गांधी यांनी याला समर्थन दिले असून असुद्दीन ओवैसी यांनी यांनी याला विरोध केला आहे. राष्ट्रवादीच्या खासदार सुप्रिया सुळे यांनीही यावर भाषण केले. यावेळी त्यांनी महाराष्ट्रातील नेते अजित पवार व चंद्रकांत दादा पाटील यांच्यावर निशाणा साधला.
महाराष्ट्रात मराठा, धनगर, लिंगायत आणि मुस्लीम आरक्षणाचा मुद्दाही सध्या लक्षवेधी आहे. त्यावरही सभागृहात चर्चा झाल्यास आम्हाला आनंदच होईल. हिला आरक्षणावरुन भाजप नेते महिला सक्षमीकरणावर बोलत आहेत. मात्र, महाराष्ट्रातील भाजपच्या प्रमुखांनीच मला व्यक्तिगत लक्ष्य करत घरी जाऊन जेवण बनवा असे म्हटल्याची आठवण सुप्रिया सुळेंनी संसदेत काढली.
महाराष्ट्रात भाजपचे प्रमुख नेते असलेल्यांनी थेट माझ्यावर टीका करताना मला घरी जाऊन चुल सांभाळण्याचा सल्ला दिला होता. सुप्रिया सुळेंनी घरी जावं, जेवण बनवावं, देश कुणी दुसरे चालवतील, आम्ही चालवू, असे म्हटले होते. हे टेलिव्हीजनवर ऑन रेकॉर्ड आहे, असेही त्यांनी म्हटले. असे म्हणत सुप्रिया सुळेंनी चंद्रकांत पाटील यांच्या विधानाची आठवण करून दिली आहे.
सुप्रिया म्हणाल्याही भाजपची खरी प्रवृत्ती आहे. त्यामुळे भाजपला उत्तरं दिली गेली पाहिजे. डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी आम्हाला मतदानाचा अधिकार दिलाय. महात्मा आणि सावित्राबाई फुले यांनी आम्हाला शिक्षणाचा अधिकार दिलाय. माझे वडिल शरद पवार यांनी पंचायत राजमध्ये महिलांना ३३ टक्के आरक्षण दिलं होतं. या गोष्टीचा आम्हाला अभिमान वाटतो, असं सुप्रिया सुळे यांनी म्हटलं आहे.
महिला आरक्षणाच्या मुद्द्यावर भाजपकडून एका महिलेने सुरुवात करण्याऐवजी निशिकांत दुबे यांना संधी दिली गेली त्याबद्दल काँग्रेसकडून जेव्हा शेरेबाजी झाली. तेव्हा अमित शाह म्हणाले, महिलांच्या भल्यासाठी केवळ महिलांनीच बोलावं असं नाही, पुरुषही बोलू शकतातच आम्ही भाऊ म्हणून बोलू शकतो. या वाक्याचा संदर्भ घेत सुप्रिया सुळे यांनी अजित पवारांना टोला लगावला."प्रत्येक घरात असे भाऊ असतातच असे नाही की जे बहिणीचं कल्याण बघतील. प्रत्येकाचं नशीब एवढं चांगलं नसतं", असा टोला सुप्रिया सुळेयांनी लगावला.
संबंधित बातम्या