नवी दुचाकी घेणाऱ्या ग्राहकांना वितरकांना द्यावे लागणार दोन हेल्मेट, अन्यथा होणार कारवाई! काय आहे प्रकार ? वाचा
मराठी बातम्या  /  महाराष्ट्र  /  नवी दुचाकी घेणाऱ्या ग्राहकांना वितरकांना द्यावे लागणार दोन हेल्मेट, अन्यथा होणार कारवाई! काय आहे प्रकार ? वाचा

नवी दुचाकी घेणाऱ्या ग्राहकांना वितरकांना द्यावे लागणार दोन हेल्मेट, अन्यथा होणार कारवाई! काय आहे प्रकार ? वाचा

Jan 05, 2025 12:38 PM IST

Pune Helmet News : पुण्यात नवीन दुचाकी घेताना ग्राहकांना दोन हेल्मेट देणे वितरकांना बंधनकारक करण्यात आलं आहे. या बाबतची नोटिस आरटीओने काढली आहे.

नवी दुचाकी घेणाऱ्या ग्राहकांना वितरकांना द्यावे लागणार दोन हेल्मेट, अन्यथा होणार कारवाई! काय आहे प्रकार ? वाचा
नवी दुचाकी घेणाऱ्या ग्राहकांना वितरकांना द्यावे लागणार दोन हेल्मेट, अन्यथा होणार कारवाई! काय आहे प्रकार ? वाचा

Pune Helmet News : देशभरात वाढते रस्ते अपघातात दुचाकीस्वारांचे सर्वाधिक मृत्यू झाले आहेत. त्यामुळे हे अपघात रोखण्यासाठी उपाय योजनेचा एक भाग म्हणून दुचाकी वितरकांनी वाहनविक्री करताना ग्राहकांना दोन हेल्मेट देणे सर्वोच्च न्यायालयाच्या निर्देशांनुसार बंधनकारण आहे. या निर्णयाची अमलबजावणी करण्यास पुण्यात सुरुवात करण्यात आली असून या बाबतची नोटिस पुण्यातील सर्व दुचाकी वितरकांना आरटीओने पाठवली आहे. हा आदेश न पाळल्यास थेट कारवाई करण्याचा इशारा देखील पुणे उपप्रादेशिक परिवहन विभागाने दिला आहे.

पुण्यात मोठ्या प्रमाणात दुचाकी वाहने आहेत. एकेकाळी सायकलींसाठी प्रसिद्ध असलेले पुणे आता दुचाकी आणि चारचाकीचे शहर म्हणून ओळखले जाऊ लागले आहे. दुचाकी वाहन खरेदी केल्यानंतर संबंधित खरेदीदाराला दोन हेल्मेट द्यावे, अशी तरतूद मोटर वाहन कायद्यात असल्याने आता पुण्यात दुचाकी खरेदी केल्यावर वाहनचालकाला दोन हेल्मेट देणे वितरकांना बंधनकारण राहणार आहे. जर बाइक खरेदीदारांना वितरकांनी दोन हेल्मेट न दिल्यास त्यांच्यावर आता कारवाई करण्यात येईल असे आदेश पुणे आरटीओने दिले आहे.

वाढत्या अपघातांमुळे निर्णय

राज्यात अपघात वाढले आहे. या वाढत्या अपघातांच्या पार्श्वभूमीवर न्यायालयाने हे आदेश दिले आहेत. मात्र, नागरिकांमध्ये जनजागृती नसल्याचे दिसून येते. बहुतांश अपघात दुचाकीस्वाराच्या डोक्यावर हेल्मेट नसल्याने त्याला जीव गमवावा लागतो. अशा अनेक घटना उघडकीस अळ्या आहेत. त्यामुळे हेल्मेटबाबत जनजागृती केली जात आहे.

या पूर्वीही अनेकवेळा देण्यात आल्या आहेत सूचना

राज्य परिवहन विभागाने यापूर्वीच दुचाकी उत्पादक आणि विक्रेत्यांना या बाबत सूचना दिल्या आहेत. राज्यातील सर्व आरटीओ कार्यालयांना याबाबत पत्राद्वारे कळविण्यात आले आहे. मात्र, या बाबत अंमलबजावणी केली जात नव्हती. त्यामुळे पुणे ‘आरटीओ’ने याबाबत वित्रकांना परिपत्रक जारी केले आहे. यापुढे जर दुचाकी वाहन खरेदीदाराला दोन हेल्मेट दिले नाही तर त्यांच्यावर कारवाई केली जाईल असे देखील या परिपत्रकात म्हटलं आहे.

Whats_app_banner

संबंधित बातम्या

विभाग
महाराष्ट्रातील बातम्या, प्रत्येक घडामोडीची ब्रेकिंग न्यूज मिळवा हिंदुस्तान टाइम्स मराठीवर