Nawab Malik gets bail : राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते व माजी मंत्री नवाब मलिक यांना सर्वोच्च न्यायालयाने पुन्हा दिलासा दिला आहे. नवाब मलिक सध्यादोन महिन्यांच्या जामिनावर आहेत. आता सर्वोच्च न्यायालयाने नवाब मलिक यांचा जामीन ६ महिन्यांनी वाढवला आहे. वैद्यकीय कारणांसाठी सर्वोच्च न्यायालयाने हा जामीन वाढवून दिला आहे.
न्यायमूर्ती बेला एम त्रिवेदी आणि पंकज मिथल यांच्या खंडपीठाने हा निर्णय दिला आहे.नबाव मलिक यांना जामीन मंजूर करण्यास तपास यंत्रणेचा आक्षेप नसल्याचे सांगत न्यायालयाने त्यांचा जामीन पुढील सहा महिन्यांसाठी वाढवत असल्याचे म्हटले. १२ ऑक्टोबर २०२३ रोजी सर्वोच्च न्यायालयाने नवाब मलिक यांचा अंतरिम जामीन तीन महिन्यांनी वाढवला होता. त्यात आता पुन्हा सहा महिन्यांची वाढ झाली आहे.
मनी लॉंन्ड्रीग प्रकरणात नवाब मलिक यांना फेब्रुवारी २०२२ मध्ये टक झाली होती. त्यानंतर वैद्यकीय आधारावर जामीन मिळवण्याचा त्यांनी प्रयत्न केला होता. मात्र अनेक वेळा त्यांना जामीन अर्ज फेटाळण्यात आला. त्यानंतर गेल्यावर्षी ऑक्टोबर महिन्यात त्यांना तीन महिन्यासाठी जामीन मंजूर करण्यात आला होता.
नवाब मलिक तुरुंगात असताना त्यांची प्रकृती बिघडली. त्यांना मूत्रपिंड विकार आणि इतर आजारांवर उपचारासाठी त्यांना ३ महिन्यांचा जामीन मंजूर करण्यात आला होता. त्यानंतर पुन्हा नवाब मलिक यांनी जामीनाची मुदत वाढवण्यासाठी अर्ज केला होता. न्यायालयाकडून त्यांची ही मागणी मान्य करत सहा महिन्यांसाठी जामीन दिला आहे.