मराठी बातम्या  /  महाराष्ट्र  /  Sunetra Pawar : बारामतीला मिळाले ३ खासदार, लोकसभेतील पराभवानंतरही सुनेत्रा पवारांची राज्यसभेवर बिनविरोध निवड

Sunetra Pawar : बारामतीला मिळाले ३ खासदार, लोकसभेतील पराभवानंतरही सुनेत्रा पवारांची राज्यसभेवर बिनविरोध निवड

Jun 19, 2024 09:48 AM IST

Sunetra Pawar : राष्ट्रवादीचे प्रफुल्ल पटेल यांनी दिलेल्या राजीनाम्यामुळे रिक्त झालेल्या राज्यसभेच्या जागेवर अजित पवार यांच्या पत्नी सुनेत्रा पवार यांची बिनविरोध निवड करण्यात आली आहे. या जागेवर पोटनिवडणूक जाहिर करण्यात आली होती.

बारामतीला मिळाले २ खासदार, लोकसभेतील पराभवानंतरही सुनेत्रा पवारांची राज्यसभेवर बिनविरोध निवड
बारामतीला मिळाले २ खासदार, लोकसभेतील पराभवानंतरही सुनेत्रा पवारांची राज्यसभेवर बिनविरोध निवड

Sunetra Pawar elected as sabha member : राष्ट्रवादीचे प्रफुल्ल पटेल यांनी दिलेल्या राजीनाम्यामुळे रिक्त झालेल्या राज्यसभेच्या जागेवर अजित पवार यांच्या पत्नी सुनेत्रा पवार यांची बिनविरोध निवड करण्यात आली आहे. या जागेवर पोटनिवडणूक जाहिर करण्यात आली होती. सुनेत्रा पवार यांच्या निवडीची घोषणा महाराष्ट्र विधानमंडळ सचिवालयाचे सचिव तथा निवडणूक निर्णय अधिकारी जितेंद्र भोळे यांनी मंगळवारी केली. सुनेत्रा पवार यांच्या निवडीमुळे बारामतीला आता ३ खासदार मिळाले आहेत. जेष्ठ नेते शरद पवार हे देखील राज्यसभेवर खासदार आहेत. त्यामुळे आता शरद पवार यांच्यासह बारामतीच्या विकासाठी नणंद आणि भावजय काय भूमिका घेणार या कडे  बारामतीकरांचे लक्ष लागून आहे. 

लोकसभा निवडणुका नुकत्याच पार पडल्या आहेत. या निवडणुकीत बारामती लोकसभा निवडणुकीकडे सर्व देशाचे लक्ष लागून होते. दरम्यान, शरद पवार यांच्या राष्ट्रवादीतून फुटून मूळ पक्ष आपल्याकडे ठेवत अजित पवार यांनी बंड केले होते. त्यांनी लोकसभा निवडणुकीत ५ जागा लढल्या. तर बारामती येथून पत्नी सुनेत्रा पवार यांना लोकसभेच्या निवडणूक रिंगणात उतरवले होते.

ट्रेंडिंग न्यूज

मात्र, सुप्रिया सुळे य यांनी सुनेत्रा पवार यांचा दारुण पराभव केला. दरम्यान, प्रफुल पटेल यांच्या राजीनाम्यामुळे राज्यसभेची एक जागा रिक्त झाली होती. या जागेवर सुनेत्रा पवार यांना निवडून देत बारामतीवर अजित पवार यांचे वर्चस्व कायम ठेवण्यासाठी महायुतीने सुनेत्रा पवार यांना बिनविरोध निवडून देण्याचे ठरवले. त्यानुसार सुनेत्रा पवार यांचा एकमेव अर्ज आल्याने त्यांची बिनविरोध निवड झाल्याचे घोषित करण्यात आले.

सुनेत्रा पवारांना मिळणार नाही पूर्ण टर्म

राज्यसभा खासदाराचा कालावधी हा ६ वर्षांचा असतो. प्रफुल पटेल हे जुलै २०२२ रोजी राज्यसभा खासदार म्हणून निवडून गेले. त्यांचा कार्यकाळ जुलै २०२२ ते जुलै २०२८ असा होता. पण प्रफुल पटेल यांनी यावर्षी मार्च २०२४ मध्ये राजीनामा देऊन पुन्हा राज्यसभा मिळवली. त्यामुळे आता पटेलांचा कार्यकाळ हा मार्च २०२४ ते मार्च २०३० राहील तर सुनेत्रा पवार या प्रफुल पटेल यांच्या रिक्त जागेवर पोटनिवडणुकीत उमेदवार म्हणून निवडून आल्याने त्यांचा कार्यकाळ हा चार वर्षांचा राहणार आहे. सुनेत्रा पवार या जून २०२४ ते जुलै २०२८ मध्ये खासदार राहतील.

WhatsApp channel