मराठी बातम्या  /  महाराष्ट्र  /  Sujata Saunik : सुजाता सौनिक यांनी इतिहास रचला! पहिल्यांदाच राज्याच्या मुख्य सचिवपदी महिला विराजमान

Sujata Saunik : सुजाता सौनिक यांनी इतिहास रचला! पहिल्यांदाच राज्याच्या मुख्य सचिवपदी महिला विराजमान

Jun 30, 2024 04:41 PM IST

Sujata Saunik chief state secretary : राज्याच्या मुख्य सचिव पदावर विराजमान होणाऱ्या सुजाता सौनिक पहिल्याच महिला अधिकारी असतील. सुजाता सौनिक या १९८७ बॅचच्या आयएएस अधिकारी आहेत.

इतिहासात पहिल्यांदाच राज्याच्या मुख्य सचिवपदी महिला विराजमान
इतिहासात पहिल्यांदाच राज्याच्या मुख्य सचिवपदी महिला विराजमान

Sujata Saunik chief state secretary : महाराष्ट्र राज्याच्या मुख्य सचिव म्हणून सुजाता सौनिक (Sujata Saunik) यांची नियुक्ती करण्यात आली आहे. राज्याच्या मुख्य सचिव पदावर विराजमान होणाऱ्या त्या पहिल्याच महिला अधिकारी असतील. सुजाता सौनिक या १९८७ बॅचच्या आयएएस अधिकारी आहेत. आज (रविवार) संध्याकाळी ५ वाजता मावळते मुख्य सचिव नितीन करीर यांच्याकडून त्या पदाची सूत्रे स्वीकारणार आहेत.

ट्रेंडिंग न्यूज

विशेष म्हणजे सुजाता सौनिक याचे पती मनोज सौनिक यांनीदेखील राज्याचे मुख्य सचिव म्हणून काम पाहिले आहे. सुजाता सौनिक यांनी याआधी राज्याच्या अतिरिक्त मुख्य सचिवपदाचा कार्यभार सांभाळला आहे. त्यानंतर आता त्यांना मुख्य सचिवपदी बढती मिळाली आहे. सुजाता सौनिक मुख्य सचिवपदी केवळ एक वर्षे राहणार आहेत. जून २०२५ मध्ये त्या सेवानिवृत्त होणार आहेत.

नितीन करीर यांच्या निवृत्तीनंतर राज्याच्या मुख्य सचिवपदी कोणाची वर्णी लागणार याकडे लक्ष लागले होते. सेवाज्येष्ठतेनुसार (१९८७ च्या तुकडीतील) गृहविभागाच्या अतिरिक्त मुख्य सचिव सुजाता सौनिक,महसूल विभागाचे अतिरिक्त मुख्य सचिव राजेश कुमार (१९८८) आणि मुख्यमंत्र्यांचे अतिरिक्त मुख्य सचिव इक्बालसिंह चहल (१९८९) हे मुख्य सचिवपदाचे दावेदार मानले जात होते. मात्र सौनिक यांना संधी मिळाली आहे.

सौनिक यांची मुख्य सचिव पदाची संधी दोन वेळा हुकली होती. मात्र या वेळी राज्याच्या इतिहासात प्रथमच महिला अधिकाऱ्यास मुख्य सचिवपदी संधीमिळाली आहे.

कोण आहेत सुजाता सौनिक?

सुजाता सौनिक या राज्याच्या वरिष्ठ अधिकारी असून त्या निवृत्त आयएएस अधिकारी मनोज सौनिक यांच्या पत्नी आहेत. मनोज सौनिकही राज्याचे मुख्य सचिवपदी राहिले आहेत. सुजाता सौनिक यांच्या नियुक्तीमुळे आता पती आणि पत्नी मुख्य सचिव होण्याची ही पहिलीच वेळ असणार आहे. सुजाता सौनिक गृहविभागाच्या अतिरिक्त मुख्य सचिव म्हणून काम पाहत आहेत. सुजाता सौनिक या १९८७ बॅचच्या आयएएस अधिकारी असून त्यांचं शालेय आणि महाविद्यालीन शिक्षण चंदीगड त्यानंतर पंजाबमध्ये झालं. त्यांनी इतिहास विषयात पदव्युत्तर पदवी घेतली आहे. यापूर्वी त्यांनी कौशल्य विकास, गृहमंत्रालय पदावर अतिरिक्त मुख्य सचिव म्हणून काम पाहिलं आहे.

महाराष्ट्रात आर्थिक सुधारणा विभागाच्या प्रधान सचिव म्हणूनही त्यांनी काम पाहिलं आहे. राज्याच्या सार्वजनिक आरोग्य विभागाच्या मुख्य सचिव म्हणूनही त्यांनी काम पाहिलं आहे.

WhatsApp channel