Solapur Suicide case : सोलापूर येथील सरवदे नगर येथे एक धक्कादायक घटना उघडकीस आली आहे. येथील मुळेगाव रोड येथील सरवदे नगरामध्ये एका आईने आपल्या दोन मुलांसह गळफास घेऊन आत्महत्या केली. ही घटना रविवारी दुपारी १२ च्या सुमारास घडली.
स्नेहा संतोष चिल्लाळ (वय ३०) असे आईचे नाव आहे. तर, संध्या संतोष चिल्लाळ (वय ११), मनोजकुमार संतोष चिल्लाळ (वय ७, सर्व रा. प्लॉट नं. ५, सरवदे नगर, जुना विडी घरकूल, सोलापूर) अशी मृत दोन मुलांची नावे आहेत. ही घटना आजू बाजूच्या नागरिकांना कळल्यावर त्यांनी पोलिसांना माहिती दिली.
पोलिसांनी घटनास्थळी येत सर्वांना शासकीय रुग्णालयात दाखल केले. डॉक्टरांनी त्यांची तपासणी करुन त्यांना मृत घोषित केले. दरम्यान या महिलेने हे टोकाचे पाऊल का उचलले या बाबत अद्याप कळू शकले नाही. महिलेचे पती संतोष सरवदे यांनी पत्नीसह मुलांना मृत अवस्थेत पाहून टाहो फोडला. त्यांचा आवाज ऐकून आजूचाजूचे नागरिक जमले. यानंतर त्यांनी एमआयडीसी पोलीस ठाण्यात याची माहिती दिली.
पोलीस हवालदार एस. एन. गायकवाड घटनास्थळी पोहोचले. त्यांनी तिघांनाही लोकांच्या मदतीने खाली उतरवण्यात आले. आधी लेकरांना नंतर स्वतः गळफास घेऊन स्नेहा सरवदे यांनी टोकाचे पाऊल का उचलले याबद्दल परिसरात तर्कवितर्क लढवले जात आहेत.