Waghnakh: लंडनहून भारतात येणारी वाघनखं नेमकी कोणाची? सुधीर मुनगंटीवारांनी केलं स्पष्ट, म्हणाले, ‘महाराजांनी ही वाघनखं..'
मराठी बातम्या  /  महाराष्ट्र  /  Waghnakh: लंडनहून भारतात येणारी वाघनखं नेमकी कोणाची? सुधीर मुनगंटीवारांनी केलं स्पष्ट, म्हणाले, ‘महाराजांनी ही वाघनखं..'

Waghnakh: लंडनहून भारतात येणारी वाघनखं नेमकी कोणाची? सुधीर मुनगंटीवारांनी केलं स्पष्ट, म्हणाले, ‘महाराजांनी ही वाघनखं..'

Updated Jul 11, 2024 08:12 PM IST

Chhatrapati Shivaji maharaj waghnakh : मुनगंटीवार म्हणाले की, शिवाजी महाराजांनी अफजल खान वधासाठी ही वाघनखं वापरल्याचा कुणीही दावा केला नाही. राज्याभिषेकासंदर्भात एक पुस्तिका सर्वांना दिली जाईल. हा संवेदनशील विषय आहे.

लंडनहून भारतात येणारी वाघनखं नेमकी कोणाची? 
लंडनहून भारतात येणारी वाघनखं नेमकी कोणाची? 

लंडनहून राज्य सरकार छत्रपती शिवाजी महाराजांची (Chatrapati Shivaji Maharaj)वाघनखं महाराष्टात तीन वर्षांच्या करारावर आणणार आहे. मात्र वाघनखांवरून महाराष्ट्राचं राजकारण चांगलंच तापलं आहे. ही वाघनखं शिवाजी महाराजांनी अफजल खानाच्या वधावेळी वापरल्याचा कोणताच पुरावा उपलब्ध नसल्याचं स्पष्टीकरण लंडनच्या व्हिक्टोरिया अँड अल्बर्ट म्युझियमने दिलं आहे. राज्यातील अनेक इतिहास संशोधकांनीही हे समोर आणलं आहे. यानंतर राज्य सरकारवर फसवणूक केल्याची टीका होत असताना मंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी यावर स्पष्टीकरण दिलं आहे.

मुनगंटीवार यांनी विधानसभेत म्हटले की, छत्रपती शिवाजी महाराजांनी ही वाघनखं वापरल्याचा दावा कुणीही केलेला नाही.आम्ही प्रतापगडाच्या पायथ्याशी असलेलंअफजल खान कबरीचे अतिक्रमण हटवल्यानंतर शिवभक्तांनी आमच्याकडे वाघनखं आणण्याची मागणी केली. त्यानंतर आम्ही ब्रिटन सरकारव व्हिक्टोरिया म्युझियमशी पत्रव्यवहार केला. आम्हाला पुरावे दिले गेलेत. व्हिक्टोरिया म्युझियमला ही वाघनखं देण्यापूर्वी त्याचे प्रदर्शन केले होते. त्याच्या बातम्याही दिल्या आहेत. म्युझियमने ती वाघनखं महाराजांची आहेत असा दावा केलेला नाही. एक वर्षासाठी वाघनखं देऊ असं त्यांनी सांगितलं होतं,पण आपल्या प्रयत्नांमुळे तीन वर्ष राहतील असा करार करण्यात आला असल्याचे सुधीर मुनगंटीवार यांनी सांगितलं.

मुनगंटीवार म्हणाले की, शिवाजी महाराजांनी अफजल खान वधासाठी ही वाघनखं वापरल्याचा कुणीही दावा केला नाही. राज्याभिषेकासंदर्भात एक पुस्तिका सर्वांना दिली जाईल. हा संवेदनशील विषय आहे. मनात शंका उपस्थित झाल्यास ती भेटून त्याचं निरसन करा, असं आवाहनही त्यांनी केलं.

या महिन्याच्या १९ तारखेला ही वाघनखं साताऱ्यातील सरकारी म्युझिअममध्ये ठेवली जाणार आहेत. छत्रपती शिवाजी महाराजांच्या वंशजांच्या उपस्थितीत ही वाघनखं शिवभक्तांच्या दर्शनासाठी ठेवली जाणार आहेत. याचं सर्वांना निमंत्रण देत आहे, असंही मुनगंटीवार यांनी सांगितलं. तसंच इतके इतिहासकार, संशोधक असताना फक्त एका इतिहासकारानेच यावर आक्षेप घेतला असल्याचंही मुनगंटीवार यांनी म्हटलं.

य़ा संवेदनशील विषयात विरोधी पक्षातील ९९ टक्के नेत्यांनी प्रतिक्रिया दिल्या नाहीत. त्यांनी समजून घेण्याचा प्रयत्न केल्याबद्दल मी विरोधी पक्षाचं, शिवभक्तांचं अभिनंदन करतो.

वाघनखांसाठी १४ लाखांचा खर्च -

वाघनखं आणण्यासाठी एकही नवीन पैशांचं भाडं दिलेलं नाही आणि दिलं जाणार नाही. वाघनखं भारतात आणण्यासाठी कोट्यवधी रुपयांचा खर्च झाल्याचा दावा केला जात आहे, मात्र आपल्या एका दिवसाच्या अधिवेशनाचा जितका आहे त्यापेक्षाही कमी खर्च यासाठी झाला आहे. जाणे,येणे, करार करणे यासाठी फक्त १४ लाख ८ हजार रुपयांचा खर्च झाल्याची माहिती सुधीर मुनगंटीवरार यांनी केला आहे.



मात्रवाघनखं ठेवण्यासाठी ७कोटी खर्च केला जात असल्याचं बोललं जात आहे. यासाठी कोणताही खर्च केलेला नाही. हा खर्च इतर शस्त्रं, प्रदर्शन, नूतनीकरण डागडुजीसाठी केलेला खर्च आहे,अशी माहिती सुधीर मुनगंटीवार यांनी दिली आहे.

 

Whats_app_banner

संबंधित बातम्या

महाराष्ट्रातील बातम्या, प्रत्येक घडामोडीची ब्रेकिंग न्यूज मिळवा हिंदुस्तान टाइम्स मराठीवर