मराठी बातम्या  /  महाराष्ट्र  /  दहावीचा पेपर संपताच पर्यवेक्षकावर भिरकावला दगड, रक्तबंबाळ अवस्थेत शिक्षकाने गाठले पोलीस ठाणे
जखमी शिक्षक निलेश दिनकर जाधव
जखमी शिक्षक निलेश दिनकर जाधव

दहावीचा पेपर संपताच पर्यवेक्षकावर भिरकावला दगड, रक्तबंबाळ अवस्थेत शिक्षकाने गाठले पोलीस ठाणे

20 March 2023, 23:33 ISTShrikant Ashok Londhe

मनमाडमध्ये एका परीक्षा केंद्रावर दहावीच्या पेपरला कॉपी करू न दिल्याच्या रागातून पेपर सुटल्यानंतर पर्यवेक्षक शिक्षकावर दगडफेक करून गंभीर जखमी केल्याची खळबळजनक घटना समोर आली आहे.

राज्यात दहावीच्या परीक्षा सुरू असून यंदा परीक्षा विभागाकडून एसएससी व एचएससी परीक्षेत ‘कॉपीमुक्त अभियान’ राबविले जात आहे. मात्र या अभियानाचे तीन-तेरा वाजल्याच्या घटना नियमित समोर येत आहे. अशीच एक घटना नाशिक जिल्ह्यातील मनमाड शहरात घडली आहे.  एका परीक्षा केंद्रावर दहावीच्या पेपरला कॉपी करू न दिल्याच्या रागातून पेपर सुटल्यानंतर  पर्यवेक्षक शिक्षकावर दगडफेक करून गंभीर जखमी केल्याची खळबळजनक घटना समोर आली आहे. ही घटना सोमवारी (२० मार्च) रोजी घडली. याप्रकरणी मनमाड पोलीस ठाण्यात गुन्हा नोंद करण्यात आला आहे. 

ट्रेंडिंग न्यूज

निलेश दिनकर जाधव (वय ३५) असे जखमी शिक्षकाचे नाव आहे. निलेश जाधव हे छत्रे विद्यालयातील कला शिक्षक आहेत. राज्यात सध्या दहावी बोर्ड परीक्षेचे पेपर सुरू असल्याने निलेश जाधव यांना येथील एच.ए.के हायस्कूलमध्ये दहावीच्या पेपरसाठी पर्यवेक्षकाचे काम दिले होते.  पेपर सुटल्यानंतर विद्यार्थ्यांच्या उत्तरपत्रिका जमा करून बाहेर पडत असताना विद्यार्थ्यांच्या गर्दीतून नीलेश जाधव यांच्यावर दगड फिरकावले गेले.

त्यांच्या डोक्याला व डोळ्याला दगड लागल्याने ते रक्तबंबाळ झाले. याच अवस्थेत त्यांनी पोलीस ठाणे गाठून तक्रार दाखल केली. मात्र हा हल्ला कोणी केला हे अद्याप समजू शकले नाही. परीक्षा सुरू असताना शिक्षकावरील हल्ला धक्कादायक आहे.

विभाग