मराठी बातम्या  /  महाराष्ट्र  /  FTII मध्ये दोन गटात पुन्हा राडा; आक्षेपार्ह बॅनरवरून हिंदुत्ववादी संघटनेच्या कार्यकर्त्यांकडून विद्यार्थ्यांना मारहाण

FTII मध्ये दोन गटात पुन्हा राडा; आक्षेपार्ह बॅनरवरून हिंदुत्ववादी संघटनेच्या कार्यकर्त्यांकडून विद्यार्थ्यांना मारहाण

Jan 23, 2024 04:38 PM IST

FTII Pune News : हिंदुत्ववादी संघटनांच्या कार्यकर्त्यांकडून विद्यार्थ्यांना झालेल्या मारहाणीच्या या घटनेमुळेFTII मध्ये तणावाचे वातावरण असून संस्थेच्या प्रवेशद्वाराजवळ पोलीस बंदोबस्त वाढवण्यात आला आहे.

एफटीआयआय परिसरात लावलेले बॅनर
एफटीआयआय परिसरात लावलेले बॅनर

नेहमी चर्चेत असणाऱ्या पुण्यातील फिल्म अँड टेलिव्हिजन इन्स्टिट्यूट ऑफ इंडियामध्ये (FTII) पुन्हा एकदा दोन गटात राडा झाल्याचा प्रकार समोर आला आहे. हिंदुत्ववादी संघटनांच्या कार्यकर्त्यांनी एफटीआयआय परिसरात घुसून विद्यार्थ्यांना मारहाण केल्याची घटना घडली आहे. एफटीआयआय मधील विद्यार्थी संघटनांकडून परिसरात बॅनर लावण्यात आले होते. यावर हिंदुत्ववादी संघटनांच्या कार्यकर्त्यांनी आक्षेप घेत कॅम्पसमध्ये घुसून विद्यार्थ्यांना केली आहे. घटनेची माहिती मिळताच पोलिसांनी घटनास्थळी धाव घेत प्रकरण शांत केले. तसेच मारहाण झालेल्या विद्यार्थ्यांना वैद्यकीय तपासणीसाठी रुग्णालयात दाखल केले.

ट्रेंडिंग न्यूज

मारहाणीच्या या घटनेमुळेFTII मध्ये तणावाचे वातावरण असून संस्थेच्या प्रवेशद्वाराजवळ पोलीस बंदोबस्त वाढवण्यात आला आहे.मिळालेल्या माहितीनुसार विद्यार्थी संघटनांकडून संस्थेच्या परिसरात बाबरी मशिदीचा उल्लेख करत वादग्रस्त बॅनरबाजी केली होती. हिंदुत्वादी संघटनांना याची माहिती समजल्यावर काही कार्यकर्त्यांनी कॅम्पसमध्ये घुसून बॅनर लावणाऱ्या विद्यार्थ्यांना मारहाण केल्याचा आरोप करण्यात येत आहे. या वादानंतर वादग्रस्त बॅनर तेथून हटवण्यात आले आहे.

 

एफटीआयआय नेहमी कोणत्या ना कोणत्या कारणाने चर्चेत असते. काही वर्षांपूर्वीदेखील FTII च्या संचालकपदी अभिनेते गजेंद्र चौहान यांची नियुक्ती करण्यात आल्यानंतर विद्यार्थ्यांनी मोठे आंदोलन सुरू केले होते. अनेक दिवस हे आंदोलन सुरू होते. विद्यार्थ्यांना आंदोलनानंतर गजेंद्र चौहान यांना हटवण्यात आले होते.

टी-२० वर्ल्डकप २०२४

विभाग