Pune HSC exam : राज्यात सध्या १२ वी बोर्डाच्या परीक्षा सुरू झाल्या आहेत. मंगळवारी इंग्रजीचा पहिला पेपर झाला. या परीक्षेच्या पहिल्याच दिवशी राज्यभर कॉपीची अनेक प्रकरणे समोर आली. दारमान, पुण्यात परीक्षेच्या तणावातून एका मुलाने सेंटरच्या दुसऱ्या मजल्यावरून उडी मारून आत्महत्या करण्याचा प्रयत्न केल्याची घटना समोर आली आहे. नऱ्हे येथील एका परीक्षा केंद्रावर हा प्रकार घडला. सुदैवाने या घटनेत त्याला किरकोळ दुखापत झाली आहे. त्याला दवाखान्यात भरती करण्यात आले असून त्याच्यावर उपचार सुरू आहेत.
महाराष्ट्र राज्य माध्यमिक आणि उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाच्या (राज्य मंडळ) बारावीच्या परीक्षेला पुण्यासह राज्यात मंगळवापासून सुरुवात झाली आहे. मंगळवारी इंग्रजीचा पेपर होता. या पेपरमध्ये दरम्यान, राज्यभरात अनेक गैरप्रकार झाल्याचे समोर आले. बोर्डाने पहिल्याच दिवशी ११ विद्यार्थ्याना रस्टीकेट केले. तर तब्बल ४२ कॉपीची प्रकरणे समोर आली. तर एका ठिकाणी तोतया विद्यार्थ्याने परीक्षा दिल्याचे समोर आले आहे आहे. असे असतांना पुण्यात नऱ्हे येथील केंद्रांवर एका विद्यार्थ्याने पेपर सुरू होण्याआधी धक्कादायक पाऊल उचललं. विद्यार्थ्याच्या या कृतीमुळे केंद्रांवर गोंधळ उडाला.
परीक्षेचा ताण आल्याने विद्यार्थ्याने हे पाऊल उचललं. नऱ्हे येथील परीक्षा केंद्रावर एका विद्यार्थ्याने पेपर सुरू झाल्यानंतर बारकोड चिटकवला. यानंतर कुणाला काही कळण्याच्या आत त्याने थेट दुसऱ्या मजल्यावरून खाली उडी मारली. तो पहिल्या मजल्यावरील गॅलरीत पडला. त्यानंतर त्याने पुन्हा खाली उडी मारली. या वेळी केंद्रावर भरारी पथक होते. त्यांनी त्याला तातडीने दवाखान्यात नेले. या घटनेत मुलाच्या हातापायाला गंभीरज जखमा झाल्या आहेत.
या घटनेमुळे परीक्षा केंद्रावर मोठा गोंधळ उडाला. मुलाला नवले हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आले आहे. त्याच्यावर उपचार करण्यात आले असून सध्या त्याची प्रकृती स्थिर आहे. पुण्यात काही केंद्रांवर किरकोळ प्रकार वगळता इतर ठिकाणी परीक्षा सुरळीत पार पडली. दरम्यान, ही घटना पोलिसांना देखील सांगण्यात आली. परीक्षा केंद्रांवर पोलिस दाखल झाले होते. त्यांनी संपूर्ण प्रकाराची माहिती घेत मुलाचा जबाब देखील घेतला आहे.
संबंधित बातम्या