Mumbai Class 4 Girl Injection News: देशाची राजधानी मुंबई येथून पालकांच्या चिंतेत भर घालणारी माहिती समोर आली. एका अज्ञात व्यक्तीने शाळेत घुसून इयत्ता चौथी शिकणाऱ्या मुलीला कुठले तरी इंजेक्शन टोचले आणि पळून गेल्याची घटना घडली, अशी तक्रार पोलीस ठाण्यात देण्यात आली. या घटनेने शाळा प्रशासनामध्ये एकच खळबळ माजली. पोलीस अज्ञात व्यक्तीचा शोध घेत आहे.
चौथीच्या वर्गातील मुलीने असा दावा केला आहे की, एका अज्ञात व्यक्तीने शाळेच्या आवारात प्रवेश करून तिला कुठले तरी इंजेक्शन टोचले आणि घटनास्थळावरून पळून गेला. यानंतर मुलीला ताबडतोब रुग्णालयात नेण्यात आले. मुलीची प्रकृती ठिक असल्याचे सांगण्यात आले. याप्रकरणी मुलीच्या पालकांनी पोलिसांत तक्रार दिली. या घटनेचे गांभीर्य लक्षात घेऊन पोलिसांनी पुढील तपासाला सुरुवात केली. या घटनेमुळे शाळेच्या आवारात मुलांच्या सुरक्षिततेवरही प्रश्नचिन्ह उपस्थित झाले आहे.
दरम्यान, ३१ जानेवारी रोजी शाळेच्या आवारात ही घटना घडल्याचा दावा केला जात आहे. मिळालेल्या माहितीनुसार, मुंबई पोलिसांच्या पाच पथकांची स्थापना करण्यात आली आहे, जे संपूर्ण प्रकरणाचा तपास करत आहेत. शाळेच्या परिसरातील सीसीटीव्ही फुटेज तपासले जात आहे. परंतु, कोणताही संशयास्पद व्यक्ती परिसरात प्रवेश करताना किंवा बाहेर पडताना दिसला नाही. मुलगी नऊ वर्षांची असून तिच्या आई- वडिलांच्या तक्रारीच्या आधारे एफआयआर नोंदवण्यात आला आहे.
पालकांनी पोलिसांना दिलेल्या फिर्यादीत असे म्हटले आहे की, मुलगी घरी आल्यानंतर तिने शाळेत तिच्यासोबत घडलेला संपूर्ण प्रकार पालकांना सांगितला. त्यानंतर पालकांनी ताबडतोब भांडुप पोलीस ठाणे गाठून अज्ञात व्यक्तीच्याविरोधात तक्रार दिली. पोलिसांनी मुलीचा जाब नोंदवून घेतला असता ती म्हणाली की, एक अज्ञात व्यक्ती शाळेच्या आवारात शिरला आणि त्याने तिला कुठले तरी इंजेक्शन टोचून तिथून पळून गेला. या घटनेत मुलीने छेडछाड किंवा शारीरिक शोषणाचा कोणताही आरोप केलेला नाही.मुलीची प्रकृती स्थिर आहे आणि तिला इंजेक्शनमुळे कोणताही दुष्परिणाम झालेला नाही. पोलिस घटनेचा अधिक तपास करत होते, अशी माहिती भांडुप पोलिसांनी दिली.
नवी मुंबईत फी न भरल्याने एका पाच वर्षांच्या मुलाला शाळेच्या आवारात काही तास रोखून धरल्याप्रकरणी शाळेतील दोन कर्मचाऱ्यांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. मुलाच्या वडिलांच्या तक्रारीवरून एनआरआय सागरी पोलिस ठाण्यात गुरुवारी दोघांविरुद्ध किशोर न्याय (मुलांची काळजी आणि संरक्षण) अधिनियम २०१५ अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला.
संबंधित बातम्या