पुढील बातमी

class="fa fa-bell">ठळक बातम्या:

अशोभनीय, निंदनीय...नव्या व्हिडिओवर संभाजीराजे संतप्त

छत्रपती संभाजी राजे

पुस्तक झालं आता व्हिडीओ आला. अशोभनीय, असहनिय तसेच निंदनीय, अशी संतप्त प्रतिक्रिया देत संबंधित पक्षाने यावर आपली भूमिका स्पष्ट करावी. केंद्र सरकारने चौकशी करून दोषींवर तात्काळ कारवाई करावी, अशी मागणी खासदार छत्रपती संभाजीराजे यांनी केली आहे. त्यांनी याबाबत भाजपचे नाव न घेता जाब विचारला आहे. दिल्ली विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर एका ट्विटर हँडलवरून छत्रपती शिवाजी महाराज आणि तानाजी मालुसरे यांचा वापर करून एक व्हिडिओ व्हायरल करण्यात आला. या व्हिडिओमध्ये छत्रपती शिवाजी महाराजांच्या चेहऱ्यावर पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि तानाजी मालुसरे यांच्या चेहऱ्यावर केंद्रीय गृहमंत्री अमित शहा वापर करण्यात आला आहे. याच व्हिडिओवरून नवा वाद निर्माण झाला आहे.

ते काय करतात मला बघायचंय, नव्या व्हिडिओनंतर राऊतांचे विधान

शिवसेना नेते आणि खासदार संजय राऊत यांनी मंगळवारी पत्रकार परिषद घेऊन हा प्रकार सर्व संबंधितांपर्यंत पोहोचविला आहे. ते आता काय भूमिका घेतात, हे आम्हाला बघायचे आहे, असे म्हटले होते. त्यानंतर छत्रपती संभाजीराजे यांनी टि्वट करुन हा प्रकार अशोभनीय असल्याचे म्हटले. 

पालकमंत्री शिंदे पहिल्यांदाच गडचिरोलीत, आत्मसमर्पित नक्षलींशी संवाद

छत्रपती संभाजीराजे यांनी आपल्या दुसऱ्या टि्वटमध्ये म्हटले की, आम्हा शिवभक्तांसाठी महाराज सर्वस्व आहेत. शिवभक्तांच्या भावना तीव्र आहेत. सरकारची जबाबदारी आहे, आमच्या भावनांची कदर करत अशा गोष्टी होऊ नयेत यासाठी दक्षता घ्यावी. सर्व राजकीय पक्षांना-कार्यकर्त्यांना विनंती आहे, कोणीही गलिच्छ राजकारणासाठी महाराजांच्या प्रतिमेचा गैरवापर करु नये.

चीनमध्ये नव्या आजाराने चौघांचा बळी, आरोग्य संघटनेची तातडीची बैठक

  • Marathi News: संबंधित इतर बातम्या वाचण्यासाठी आम्हाला लाईक करा आणि फॉलो करा.
  • Web Title:yuvraj chhatrapati Sambhaji angry on chhatrapati shivaji maharaj new controversial video for delhi assembly election 2020 bjp