पुढील बातमी

class="fa fa-bell">ठळक बातम्या:

गडचिरोलीत नक्षलवाद्यांनी गोळीबार करत तरुणाचे केले अपहरण

गडचिरोली नक्षलवाद्यांनी केला हल्ला

गडचिरोलीमध्ये बुधवारी नक्षलवाद्यांनी दोघांवर गोळीबार केला. या गोळीबारामध्ये एक जण गंभीर जखमी झाला आहे. तर नक्षलवाद्यांनी दुसऱ्याचे अपहरण केले आहे. गडचिरोली जिल्ह्यातल्या एटापल्ली तालुक्यात ही घटना घडली आहे. या घटनेमुळे एकच खळबळ उडाली आहे. 

पाक पुन्हा तोंडावर आपटले, लंकेच्या मंत्र्यांनी दिला दहशतवादाचा दाखला

गडचिरोलीत दोन आत्मसमर्पित नक्षलवाद्यांवर सशस्त्र नक्षलवाद्यांनी गोळीबार केला. जारेवाडा येथे राहणारा अशोक होळी आणि नैनवाडी येथे राहणारा मधूकर मट्टामी यांच्यावर नक्षलवाद्यांनी गोळीबार केला आहे. दोघे ही वैयक्तीक कामासाठी एटापल्ली तालुक्यातील गिलनगुडा येथे गेले होते. 

मागण्या मान्य न झाल्यामुळे उदयनराजे यांचा भाजप प्रवेश

काम आटपून परत येत असताना नक्षलवाद्यांच्या एक्शन टीमने दोघांवर गोळीबार केला. या गोळीबारात अशोक होळी याला दोन गोळ्या लागल्याने तो गंभीर जखमी झाला. त्याला गडचिरोलीतील जिल्हा सामान्य रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले आहे. तर मधूकर मट्टामी याचे नक्षलवाद्यांनी अपहरण केले. 

उन्नाव प्रकरण :पीडितेची साक्ष नोंदविण्यासाठी एम्समध्ये तात्पुरते कोर्ट