पुढील बातमी

class="fa fa-bell">ठळक बातम्या:

धक्कादायक: तरुणाने स्वत:च्या तोंडात सुतळी बॉम्ब फोडला

परळी रेल्वे स्टेशन

हैदराबाद पूर्णा रेल्वेमध्ये एका तरुणाने तोंडात सुतळी बॉम्ब धरुन पेटवल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. सुतळी बॉम्बच्या स्फोटात हा तरुण गंभीर जखमी झाला आहे. जखमी तरुणावर रुग्णालयात उपचार सुरु आहेत सुतळी बॉम्बच्या स्फोटाचा आवज आल्यामुळे हैदराबाद पूर्णा एक्स्प्रेसमध्ये असलेल्या प्रवाशांमध्ये भितीचे वातावरण पसरले होते. 

 

 

गोएअरची १८ विमाने सोमवारी रद्द, विमानतळांवर हजारो

बीडच्या परळी रेल्वे स्थानकावर थांबलेल्या हैदराबाद-पूर्णा रेल्वेमध्ये सकाळी पावणे अकराच्या सुमारास हा प्रकार घडला आहे. सय्यद आक्रम (१९ वर्ष) असं जखमी झालेल्या तरुणाचे नाव आहे. सय्यद आई आणि बहिणीसोबत हैदराबाद येथे जात होता. परळी स्थानकावर रेल्वे उभी असताना सय्यद टॉयटेलमध्ये जातो असे सांगून गेला. त्याचवेळी त्याने तोंडात सुतळी बॉम्ब ठेवून तो पेटवून दिला. या स्फोटामध्ये त्यांच्या तोंडाला गंभीर दुखापत झाली आहे. 

'महाराष्ट्रानंतर झारखंडही गमावलं, भाजपला आत्मचिंतनाची गरज'

रेल्वेमधील प्रवाशांनी टॉयलेटमध्ये धाव घेत जखमी झालेल्या सय्यदला सुरुवातीला परळीतील जिल्हा रुग्णालयात दाखल केले. त्यानंतर पुढील उपचारासाठी त्याला अंबाजोगाईच्या स्वामी रामानंद तिर्थ रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. सय्यदवर सध्या उपचार सुरु आहेत. दरम्यान, ही घटना नेमकी कशी घडली याचा तपास परळी पोलिस करत आहेत. 

रविंद्र जडेजासोबतच्या इंग्लिश-विंग्लिशवर हर्षा भोगलेंचे प्रतिक्रिया