पुढील बातमी

class="fa fa-bell">ठळक बातम्या:

आत्महत्येचे सत्र सुरुच; मनमाडमध्ये तरुण शेतकऱ्याची आत्महत्या

आत्महत्या (प्रतिकात्मक छायाचित्र)

नाशिक जिल्ह्यामध्ये शेतकरी आत्महत्येचे सत्र सुरुच आहे. तीन शेतकऱ्यांनी आत्महत्या केल्याची घटना ताजी असतानाच जिल्ह्यात आणखी एका तरुण शेतकऱ्याने आपले जीवन संपवले आहे. नांदगांव तालुक्यातील नारायणगाव येथील ३० वर्षीय तरुण शेतकरी किरण उगले याने आत्महत्या केली आहे. शेतातील विजेच्या खांबाला गळफास लावून या शेतकऱ्याने आत्महत्या केली.

अमित शहांच्या भेटीनंतर फडणवीस म्हणाले, लवकरच नवे सरकार येईल पण...

सततची नापिकी आणि कर्जबाजारीपणाला कंटाळून या शेतकऱ्याने आपले जीवन संपवले आहे. गेल्या दोन वर्षांपासून किरण यांच्या शेतीचे मोठे नुकसान झाले आहे. तसंच  त्यांच्यावर युनियन बँकेचे तसेच वैयक्तिक कर्ज होते, अशी माहिती नातेवाईकांनी दिली आहे. नाशिक जिल्ह्यात ही चौथी शेतकरी आत्महत्येची घटना आहे. सरकारने दुष्काळग्रस्त भागामध्ये त्वरित पंचनामे करुन शेतकऱ्यांना मदत करावी अशी मागणी शेतकऱ्यांनी केली आहे. 

मंत्रालयाबाहेर शेतकरी संघटनेचे आंदोलन; राजू शेट्टी पोलिसांच्या ताब्यात