पुढील बातमी

class="fa fa-bell">ठळक बातम्या:

जळगावमध्ये रेल्वेसमोर उडी घेऊन तरुणीची आत्महत्या

प्रातिनिधिक छायाचित्र

जळगावमध्ये धावत्या रेल्वेसमोर उडी घेऊन एका तरुणीने आत्महत्या केली. ही घटना मंगळवारी दुपारी शहरातील आशाबाबानगरातून जाणाऱ्या रेल्वे रुळांवर घडली. या तरुणीची अद्याप ओळख पटलेली नाही.

तरुणीचे वय सुमारे २० ते २५ वर्षे असण्याची शक्यता आहे. मंगळवारी सकाळपासून ती या परिसरात रेल्वे रुळांवर फिरत होती. परिसरातील नागरिकांनी तीन-चार वेळा तिला हटकले. यानंतर ती रुळांपासून काही अंतर लांब जाऊन उभी होती.

कोंढवा भिंत दुर्घटना; तिघांविरोधात दोषारोपपत्र सादर

नंतर तिने दुपारी दोन वाजता एका धावत्या रेल्वेसमोर उडी घेऊन आत्महत्या केली. या घटनेनंतर परिसरात गर्दी झाली होती. नागरिकांनी लोहमार्ग पोलिसांना माहिती दिल्यानंतर तिचा मृतदेह पोलिसांनी ताब्यात घेतला. ओळख पटवण्यासाठी हा मृतदेह शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालयात ठेवण्यात आला. ही तरुणी उच्चशिक्षित व उच्चभ्रू कुटुंबातील असण्याची शक्यता पोलिसांनी व्यक्त केली.