पुढील बातमी

class="fa fa-bell">ठळक बातम्या:

यवतमाळमध्ये वीज कोसळून एकाच कुटुंबातील सहा जणांचा मृत्यू

संग्रहित छायाचित्र

यवतमाळ जिल्ह्यात रविवारी रात्री एक धक्कादायक घटना घडली आहे. राळेगाव तालुक्यातील गुजरी गावात रात्री उशिरा वीज कोसळून एकाच कुटुंबातील सहा जणांचा मृत्यू झाला आहे. मृतांमध्ये ४ पुरुष आणि २ महिलांचा समावेश आहे. 

लॉकडाऊनचा कालावधी आणखी वाढणार का ? कॅबिनेट सचिव म्हणाले...

रविवारी रात्री यवतमाळमध्ये अवकाळी पावसाने हजेरी लावली. त्यावेळी विजांचा कडकडाट सुरु होता. गुजरी गावात अरुण गोंडे यांच्या शेतात निमगव्हान येथील गायी चारणारे काही दिवसांपासून गायी चाराईसाठी शेतातील शेडमध्ये मुक्कामी होते. संध्याकाळी राळेगाव तसेच परिसरात विजेच्या कडकडाटासह मुसळधार पाऊस झाला. त्यामुळे रात्री उशिरा अचानक वीज कोसळली. त्यात सहा जणांचा जागीच मृत्यू झाला. यामध्ये ४ पुरुष आणि २ महिलांचा समावेश आहे. एकाच कुटुंबातील सहा जणांचा मृत्यू झाल्याने परिसरात हळहळ व्यक्त केली जात आहे.

पाकची पुन्हा कुरघोडी, कोरोनातही काश्मिरचा मुद्दा रेटला