पुढील बातमी

class="fa fa-bell">ठळक बातम्या:

देश तालिबानी पद्धतीने चालविला जाऊ शकत नाही - संजय राऊत

संजय राऊत

अभिनेत्री दीपिका पदुकोण हिची प्रमुख भूमिका असलेल्या छपाक सिनेमावरून शिवसेना नेते आणि खासदार संजय राऊत यांनी पुन्हा एकदा भाजपवर निशाणा साधला. दीपिका पदुकोण हिच्यावर आणि तिच्या सिनेमांवर बहिष्कार घालण्याची मागणी चुकीची असल्याचे संजय राऊत यांनी म्हटले आहे. त्याचवेळी देश तालिबानी पद्धतीने चालविला जाऊ शकत नाही, असेही त्यांनी म्हटले आहे. पीटीआयशी बोलताना त्यांनी हे मत व्यक्त केले.

..तर उद्धव ठाकरे सत्तेतून बाहेर पडतील, गडाखांचा इशारा

दिल्लीतील जवाहरलाल नेहरू विद्यापीठातील विद्यार्थ्यांकडून सुरू असलेल्या आंदोलनाला पाठिंबा देण्यासाठी दीपिका पदुकोण तिथे गेली होती. तिच्या या कृतीनंतर काहींनी तिचे कौतुक केले तर काहींनी तिच्यावर टीका केली. आपल्या सिनेमाच्या प्रमोशनसाठी दीपिकाने ही कृती केल्याचे काहींचे म्हणणे होते. त्याचवेळी तिच्या छपाक सिनेमावर बहिष्कार घालण्याची मागणीही काही जणांकडून करण्यात आली. या सर्व पार्श्वभूमीवर संजय राऊत म्हणाले, दीपिका पदुकोण आणि तिच्या सिनेमांवर बहिष्कार घालण्याची मागणी चुकीची आहे. देश तालिबानी पद्धतीने चालू शकत नाही. 

बैठकीपूर्वीच विरोधकांच्या एकीला सुरूंग, आता मायावतीही काँग्रेसविरोधात

छपाक सिनेमाचे दिग्दर्शन मेघना गुलजार यांनी केले आहे. मध्य प्रदेश आणि छत्तीसगढमधील काँग्रेस सरकारने हा सिनेमा करमुक्त केला आहे.