पुढील बातमी

class="fa fa-bell">ठळक बातम्या:

वाधवान बंधूंना सीबीआयच्या ताब्यात देणार - गृहमंत्री अनिल देशमुख

कपिल वाधवान

डीएचएफएल आणि येस बँक गैरव्यवहार प्रकरणातील आरोपी कपिल आणि धीरज वाधवान यांना महाराष्ट्र सरकार केंद्रीय अन्वेषण विभागाच्या (सीबीआय) ताब्यात देणार असल्याचे राज्याचे गृहमंत्री अनिल देशमुख यांनी बुधवारी सकाळी फेसबुक लाईव्हच्या माध्यमातून सांगितले. वाधवान कुटुंबियांना काही दिवसांपूर्वी लॉकडाऊनच्या काळात महाबळेश्वरमध्ये गेल्यामुळे ताब्यात घेण्यात आले होते. त्यांना तेथील एका शाळेत ठेवण्यात आले होते. या कुटुंबियांचा १४ दिवसांचा क्वारंटाईन कालावधी बुधवारी संपतो आहे. त्या पार्श्वभूमीवर अनिल देशमुख यांनी ही माहिती दिली.

लॉकडाऊनमुळे कोरोनाची पहिली लाट काही प्रमाणात रोखली, पण...

वाधवान बंधू आणि त्यांच्या कुटूंबातील इतर २१ सदस्य यांचा क्वारंटाईनचा कालावधी बुधवारी दुपारी संपुष्टात येत आहे. त्यानंतर वाधवान बंधूंना सीबीआयच्या ताब्यात देण्यास आम्ही तयार आहोत. सीबीआयने रितसर मागणी करावी, असे त्यांनी म्हटले आहे. आम्ही सीबीआय आणि ईडी या दोन्ही तपाससंस्थांना त्यासाठी पत्र पाठवले आहे. सध्या हे सर्वजण महाबळेश्वर येथे एका शाळेत मुक्कामाला आहेत.

जिओमध्ये फेसबूकची ५.७ अब्ज डॉलरची गुंतवणूक, ...हे आहे कारण

लॉकडाऊनच्या काळात मुंबईहून महाबळेश्वरला फिरायला गेलेल्या वाधवान कुटुंबियांना ७ एप्रिलला सातारा पोलिसांनी ताब्यात घेतले होते. राज्याचे गृह विभागाचे प्रधान सचिव (विशेष) अमिताभ गुप्ता यांनी त्यांना लॉकडाऊनमध्ये प्रवास करण्याची परवानगी देणारे पत्र दिले होते. याच पत्रामुळे त्यांनी मुंबई ते सातारा असा प्रवास केला होता. हा सर्व प्रकार उघडकीस आल्यावर अमिताभ गुप्ता यांना सक्तीच्या रजेवर पाठविण्यात आले आहे.

  • Marathi News: संबंधित इतर बातम्या वाचण्यासाठी आम्हाला लाईक करा आणि फॉलो करा.
  • Web Title:Wont let DHFL scam accused Wadhawans flee country like other defaulters says Maharashtra minister