पुढील बातमी

class="fa fa-bell">ठळक बातम्या:

उस्मानाबाद : महिला अत्याचाराविरोधात नारी शक्ती एकवटली

उस्मानाबादमध्ये महिला संघटनांनी देशासह जिल्ह्यातील महिला अत्याचाराच्या घटनेसंदर्भात मोर्चा काढला

हैदराबाद येथील पशुवैद्यकीय रुग्णालयातील डॉक्टर महिलेवरील अत्याचार, उस्मानाबाद जिल्ह्यातील तुगावमध्ये १४ वर्षांच्या मुलीवरील अत्याचार आणि उमरगा तालुक्यातील मुळज येथे मुलीला तिच्या घरासहित पेटवून देण्याचा प्रयत्न यासरख्या भयभीत करुन सोडणाऱ्या घटनांच्या पार्श्वभूमीवर उस्मानाबादमध्ये निषेध नोंदवण्यात आला.  उस्मानाबादमधील जवळपास २१ महिला संघटनांनी गुरुवारी एकत्रित येऊन समन्वय समितीच्या माध्यमातून जिल्हाधिकारी कार्यालयावर मोर्चा काढला. यावेळी महाविद्यालयातील विद्यार्थीनी देखील रस्त्यावर उतरल्याचे पाहायला मिळाले.  महिला अत्याचारासंदर्भातील खटले जलदगती न्यायालयात चालवण्याची मागणी यावेळी करण्यात आली

उन्नाव बलात्कार: ९० टक्के भाजलेल्या पीडितेवर दिल्लीत उपचार होणार

'हम भारत की नारी है, फुल नही चिंगारी है!', 'भारत माता की जय!',  'स्त्रियांचा सन्मान करा, आरोपींना कडक शासन करा', यासारख्या घोषणा देत देशभरातील महिलांच्या अत्याचाराच्या घटनेतील आरोपीला तात्काळ शिक्षा करण्यात यावी, अशी मागणी यावेळी केली.  तुळजाभवानी जिल्हा स्टेडियम पासून निघालेला हा मोर्चा डॉक्टर आंबेडकर पुतळा- छत्रपती शिवाजी महाराज पुतळा या मार्गावरुन जिल्हाधिकारी कार्यालयात धडकला. त्यानंतर महिला संघटनेकडून जिल्हाधिकाऱ्यांना निवदेन देण्यात आले.

राज्यातील या दोघी राष्ट्रीय 'फ्लोरेंस नाईटिंगेल' पुरस्काराने सन्मानितमहाविद्यालयीन तरुणींनी देखील या मोर्चात सहभाग घेतला होता.

अत्याचार झालेल्या महिलांना न्याय देण्यासाठी संबधीत प्रकरणे जलदगती न्यायालयात चालवून आरोपींना कठोर शिक्षा द्यावी, समाजकंटकांच्या वयाचा मुद्दा लक्षात न घेता कठोरात कठोर शिक्षा होण्यासाठी योग्य ती पावले उचलावीत, समाजात कायद्याचा  धाक निर्माण होण्यासाठी योग्य ती कायदेशीर गरज आहे, करणाऱ्या घोषणा देत वातावरण दणाणून सोडले होते. 
जिल्ह्यातील २१ महिला संघटनेशी संलग्नित असलेल्या महिलांनी या मोर्चात सहभाग घेतला होता.

  • Marathi News: संबंधित इतर बातम्या वाचण्यासाठी आम्हाला लाईक करा आणि फॉलो करा.
  • Web Title:womens and Students shout slogans during a protest against the Hyderabad rape murder case and growing incidents of crime against women in osmanabad