पुढील बातमी

class="fa fa-bell">ठळक बातम्या:

सेल्फीच्या नादात महिला दरीत पडली; सुदैवाने वाचली

महिला दरीत पडली

नाशिकच्या सापुतारा येथे सेल्फीच्या नादात एक महिला दरीत कोसळली. मात्र दैव बल्लवतर म्हणून ती वाचली. ही महिला गंभीर जखमी झाली असून तिला नवागाव येथील तरुणांनी खोल दरीतून बाहेर काढले. सध्या तिच्यावर नाशिक येथील खासगी रुग्णालयात उपचार सुरु आहेत. 

पीएमसी बँकेवर आरबीआयचे निर्बंध: बँकेचे सर्व व्यवहार ठप्प

नाशिकच्या बोरगाव नजिक असलेल्या सापुताराच्या सन राईज पॉईंटवर ही महिला कुटुंबियांसोबत पिकनिकसाठी आली होती. सुषमा मिलिंद पगारे (४८ वर्ष) असं या महिले नाव असून ती नाशिक येथे राहते. सन राईज पॉईंटवर सेल्फी काढताना अचानक तिचा तोल गेला आणि ती दरीत कोसळली. 

'अयोध्येप्रती हिंदूंच्या श्रद्धेबद्दल प्रश्नचिन्ह उपस्थित करणे अशक्य'

या घटनेची माहिती मिळताच सापुताराजवळच्या नवागावातील तरुण मदतीसाठी धावून आले. त्यांनी दरीत उतरून महिलेला सुखरुप बाहेर काढले. या महिलेच्या डोक्याला आणि कंबरेला गंभीर दुखापत झाली आहे. तिच्यावर सापुतारा येथील प्राथमिक आरोग्य केंद्रात उपचार करण्यात आले. मात्र पुढीत उपचारासाठी तिला नाशिक येथील खासगी रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. 

मिलिंद देवरांचे ते ट्विट, नरेंद्र मोदींचे कौतुक, आणि....