पुढील बातमी

class="fa fa-bell">ठळक बातम्या:

देवदूत ठरलेल्या जवानांना महिलांनी बांधल्या राख्या

जवानांना बांधल्या राख्या

पश्चिम महाराष्ट्राला मुसळधार पावसाने झोडपून काढले होते. त्यामुळे आलेल्या महापूरामुळे सातार, सांगली आणि कोल्हापूरातील जनजीवन पूर्णत: विस्कळीत झाले होते. या महापूराने आतापर्यंत २९ जणांचा बळी घेतला आहे. आता हा महापूर हळूहळू ओसरत चालला असून जनजीवन पूर्वपदावर येत आहे. दरम्यान, सातारा, सांगली आणि कोल्हापूरांना महापूरातून वाचण्यासाठी आलेल्या देवदूत जवानांचे त्यांनी आभार मानले आहे. तर सांगलीमधील महिलांनी जवानांना राख्या बांधून त्यांचे विशेष आभार मानले आहे.

मुकेश अंबानींनी केली जिओ फायबरची घोषणा, ५ सप्टेंबरला लाँच

कोल्हापूर, सांगलीमध्ये महापूराने थैमान घातले होते. या महापूरामुळे शहरासह गावंच्या गावं पाण्याखाली गेली होती. नागरिकांचे संसार उध्वस्त झाले होते. पूरामध्ये अडकलेल्या नागरिकांच्या बचावकार्यासाठी एनडीआरएफचे जवान, लष्कराचे जवान, नौदलाचे जवान आणि वायूदलाचे जवान यांनी आपले प्राणपणाला लावले. लहान मुलांपासून महिला, वयोवृध्द तसंच जनावरांना देखील त्यांनी सुरक्षित स्थळी हलवले.

पुणे-बंगळुरु मार्गावर ८ दिवसांनंतर जड वाहतूक सुरु

महापूरातून आपली सुटका केल्यामुळे सांगलीकरांनी या सर्व जवानांचे आभार मानले. ऐवढेच नाही तर सर्व महिलांनी आणि तरुणींनी एकत्र येत सर्व जवानांना राख्या बांधल्या आणि आम्हाला सुखरुप वाचवल्याबद्दल त्यांचे आभार मानले. या दरम्यान, सर्व सांगलीकरांनी 'भारत माता की जय' अशा घोषणा दिल्या.

'जम्मू-काश्मीर हिंदू बहुल राज्य असते तर कलम ३७० हटवले नसते'