पुढील बातमी

class="fa fa-bell">ठळक बातम्या:

उस्मानाबाद : विहिरीत महिलेचा मृतदेह आढळल्याने खळबळ

पोलिस

उस्मानाबाद जिल्ह्यातील परंडा शहरात विहिरीत बुडून मृत्यू झालेल्या महिलेचे प्रेत आढळल्याने एकच खळबळ माजली आहे.  एका शेतकर्‍याच्या कोरड्या विहिरीला परतीच्या पावसाने आलेले पाण्यात महिलेचा मृतदेह तरंगताना आढळला. मयत महिलेची ओळख अद्याप पडलेली नाही.  
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, महादेव यशवंत मेहेर यांच्या शेतातील विहिरीत अज्ञात महिलेचे प्रेत तरंगताना आढळून आले. शेतकरी मेहेर यांनी याची माहिती पोलिसांना दिली. त्यानंतर पोलिस निरीक्षक इकबाल सय्यद, पोलीस निरीक्षक उपनिरिक्षक बनसोडे, पोलीस हवालदार खुने, महिला पोलिस शबाना मुल्ला यांनी घटनास्थळी धाव घेत पंचनामा केला. मृत महिलेचे प्रेत बाहेर काढण्यासाठी नगरपरिषद कर्मचार्‍यांना बोलावण्यात आले होते.  

तरुणीच्या कॉकपीटमधल्या 'त्या' फोटोमुळे वैमानिकाची नोकरीच गेली

महादेव मेहेर हे दररोजच्या प्रमाणे शेतात गेले व दुष्काळामुळे कोरड्या पडलेल्या विहिरीचे पाणीपातळी किती वाढली आहे, हे पाहण्यासाठी ते विहिरीवर गेले असताना एका महिलेचे प्रेत तरंगताना त्यांना आढळले. महिलेचे प्रेत चार ते पाच दिवसांपासून  विहिरीत असावे, असा अंदाज पोलिसांनी वर्तवला आहे.

मुनगंटीवार म्हणाले, हम साथ साथ है!

परंडा पोलिस ठाण्यात महिला मिसींग दाखल नसल्याने मयत महिलेची ओळख पटविण्यासाठी परंडा पोलिसांना अपयश येत आहे. याप्रकरणात त्यांनी करमाळा, बार्शी पोलिसांशी संपर्क साधून ते या प्रकरणातील तपास करत आहेत. महिलेचे प्रेत आढळून आल्याची माहिती वार्‍यासारखी पसरल्याने घटनास्थळी अनेकांनी मोठी गर्दी केली होती.