पुढील बातमी

class="fa fa-bell">ठळक बातम्या:

लासलगावला महिलेवर पेट्रोल टाकून जिवंत जाळण्याचा प्रयत्न

हिंगणघाट येथे भरचौकात तरुणीवर पेट्रोल टाकून जाळले (प्रतिकात्मक छायाचित्र)

हिंगणघाट येथील घटना ताजी असतानाच नाशिक जिल्ह्यात अशाच प्रकारची घटना घडली आहे. निफाड तालुक्यातील लासलगाव बसस्थानकाच्या आवारात एका महिलेवर पेट्रोल टाकून जाळण्याचा प्रयत्न करण्यात आला. ही घटना शनिवारी सायंकाळी पाच ते साडेपाच वाजण्याच्या सुमारास घडली. दोन ते तीन अज्ञात हल्लेखोरांनी हा प्रकार केल्याचे सांगण्यात येते. घटनेनंतर हल्लेखोर फरार झाले आहेत.

...तर कीर्तन सोडून शेती करेन, इंदुरीकर महाराज व्यथित

गेल्या दोन ते तीन दिवसांपासून पीडित महिला आणि संशयित युवकामध्ये वाद सुरु असल्याचे सांगण्यात येते. त्या वादाचे पर्यावसन आज पेट्रोल टाकून पेटवण्यात झाले. प्रेमसंबंधातून हा प्रकार झाल्याचेही सांगण्यात येते. 

कुमार विश्वास यांच्या एसयूव्हीची घराबाहेरुन चोरी

मुख्यमंत्री उद्धव ठाकरे हे नाशिक दौऱ्यावर येणार असल्याने संपूर्ण पोलिस फौजफाटा बंदोबस्तात व्यस्त आहे. त्याचवेळी ही घटना घडल्याने खळबळ उडाली आहे. या घटनेबाबत विस्तृत माहिती अद्याप समोर आलेली नाही.

बॉम्बे हायकोर्टाचे न्यायमूर्ती धर्माधिकारी यांचा राजीनामा