राज्यात मोठ्या प्रमाणात कोरोना विषाणूच्या चाचण्या घेण्यात येत आहेत. आतापर्यंत ९० हजारहून अधिक चाचण्या करण्यात आल्या असून मृतांच्या दरातही घट झाली आहे. सध्याची परिस्थिती ही आशादायी असून राज्य सरकार कोरोना विषाणूच्या संकटातून सावरण्यासाठी सर्वोत्परी प्रयत्न करत आहे, अशी माहिती राज्याचे आरोग्य मंत्री राजेश टोपे यांनी दिली. राजेश टोपे म्हणाले की, राज्यात एकूण ३८ लॅब उपलब्ध असून प्रत्येक दिवसाला ७ हजारहून अधिक चाचण्या घेणे शक्य होत आहे.
वैद्यकीय कर्मचाऱ्यांवर हल्ला करणाऱ्याला ७ वर्षांपर्यंत तुरुंगवास होणार
कोरोनाग्रस्तांच्या आकड्यातील वेग हा पूर्वीपेक्षा कमी झाला आहे. यापूर्वी दोन ते तीन दिवसांत कोरोनाग्रस्तांचा आकडा हा दुप्पट व्हायचा सध्याच्या घडीला हा कालावधी ७ दिवसांवर पोहचला आहे. याचा अर्थ कोरोनाग्रस्तांचा आकडा दुप्पट होण्यासाठी ७ दिवसांचा कालावधी लागत आहे. हा कालावधी वाढवून आपल्याला कोरोनाचा लढा जिंकण्याच्या दिशेने प्रवास करायचा आहे, असे राजेश टोपे यांनी म्हटले आहे. राज्यातील १४ हॉटस्पॉट ठिकाणांपैकी आता केवळ मुंबई, पुणे, नागपूर नाशिक आणि मालेगाव ही पाच शहरेच आता हॉटस्पॉटमध्ये आहेत. ही समाधानकारक बाब आहे, असे आरोग्य मंत्र्यांनी सांगितले. जागतिक आरोग्य संघटनेच्या मार्गदर्शनानुसार राज्य सरकार योग्य ती पावले उचलत आहे. नियम पाळून आपण सकारात्मक दिशेने प्रवास करत आहोत, अशी आश्वासक माहिती राजेश टोपे यांनी यावेळी केली.
'कामगाराला कोरोना झाल्यास मालकाविरुद्ध कारवाईचा प्रश्नच येत नाही'
मुंबईतील धारावीत होम क्वॉरंटाइनची मोठी समस्या आहे. धारावीत सोशल डिस्टन्सिंग पाळणे शक्य नाही. त्याठिकाणी क्वॉरंटाइनची व्यवस्था करुन योग्य ती पावले उचलण्यासाठी राज्य सरकार योग्य तो निर्णय घेईल, असेही ते म्हणाले. ४३१ नव्या रुग्णांसह राज्यातील कोरोनाग्रस्तांचा आकडा हा ५ हजार ६४९ वर पोहचला असून आतापर्यंत राज्यात २६९ लोकांनाच कोरोनामुळे मृत्यू झाला आहे.