पुढील बातमी

class="fa fa-bell">ठळक बातम्या:

मला बदनाम करण्यासाठी ही अफवा पसरवली जात आहे : राधाकृष्ण विखे पाटील

राधाकृष्ण विखे पाटील

लोकसभा निवडणुकीनंतर काँग्रेसला अलविदा करुन भाजमध्ये सामील झालेले राधाकृष्ण विखे-पाटील पुन्हा काँग्रेसमध्ये येणार असल्याची चर्चा राजकीय वर्तुळात रंगत आहे. मात्र या चर्चेला राधाकृष्ण विखे पाटील यांनी पूर्णविराम दिलाय. मी काँग्रेसमध्ये परतणार असल्याच्या वृत्त चुकीचे असल्याचे त्यांनी म्हटले आहे.  

चड्डीवाल्या RSS च्या हातात सत्ता द्यायची नाही : राहुल गांधी

जिल्हा परिषदेच्या अध्यक्ष-उपाध्यक्षपदाच्या निवडणुकीसंबंधी भाजपच्या कोअर समितीची शनिवारी नगरमध्ये  बैठक पार पडली. त्यानंतर प्रसारमाध्यमांशी संवाद साधताना विखे पाटील म्हणाले की, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या विचारामुळे मी भाजपमध्ये प्रवेश केला असून भाजप कधीच सोडणार नाही. मी काँग्रेसमध्ये परतण्याचा प्रश्नच उद्भवत नाही.  सोशल मीडियाच्या माध्यमातून अशा प्रकारच्या अफवा पसरवून मला बदनाम करण्याचा डाव सुरु आहे. यासंदर्भात तक्रार करणार आहे, असेही ते म्हणाले.   

'२ लाखांपेक्षा जास्त कर्ज असणाऱ्या शेतकऱ्यांचा सरकारकडून वेगळा विचार'

उद्धव ठाकरे यांच्या नेतृत्वाखालील महाविकास आघाडी सरकार अपघातानेच सत्तेत आले आहे. त्यामुळे काही लोकांना हुडहुडी आली आहे, असा टोलाही त्यांनी यावेळी लगावला. राधाकृष्ण विखे-पाटील यांनी नुकतीच मुंबईत मल्लिकार्जुन खरगे यांची भेट घेतल्याची चर्चा रंगली होती. त्यानंतर ते पुन्हा काँग्रेसच्या वाटेवर असल्याचे बोलले जात होते. मात्र खरगे यांची भेटच घेतली नसल्याचे त्यांनी म्हटले आहे. भाजपच्या अनेक आमदारांनी विखे-पाटील यांच्यासंदर्भात पक्षश्रेष्ठींकडे नाराजी व्यक्त केली होती. भाजमध्ये आपापसात अंतर्गत वाद धुसमूसत असल्याच्या वृत्तानंतर राम शिंदे आणि राधाकृष्ण विखे पाटील पहिल्यांदाच एकत्र आल्याचे पाहायला मिळाले.