पुढील बातमी

class="fa fa-bell">ठळक बातम्या:

... नाहीतर आम्ही पूरग्रस्तांसाठी रस्त्यावर उतरू - शरद पवार

शरद पवार

सांगली, कोल्हापूर आणि साताऱ्यातील पूरग्रस्तांना आवश्यक मदत मिळवून देण्यासाठी गरज पडल्यास रस्त्यावर उतरण्याचा निर्धार राष्ट्रवादी काँग्रेसने केला आहे. या संदर्भात पक्षाने सरकारकडे केलेल्या मागण्या पूर्ण केल्या नाहीत, तर आंदोलन करण्यात येईल, असे राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी रविवारी स्पष्ट केले. 

राजकारणात रेडिमेड कपडे घालत नाहीत, जयंत पाटलांचा भाजपला टोला

पूरग्रस्त सांगली, सातारा आणि कोल्हापूरमध्ये काय केले पाहिजे, यासंबंधीच्या मागण्या घेऊन शरद पवार मंगळवारी, २० ऑगस्ट रोजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची भेट घेणार आहेत. या बैठकीनंतर पक्ष पुढील रणनिती निश्चित करू शकतो. पश्चिम महाराष्ट्रातील हे तिन्ही जिल्हे काही वर्षांपूर्वी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे बालेकिल्ले म्हणून ओळखले जात होते. पूरग्रस्त भागातील लोकांना दिलासा देण्यासाठी आणि त्यांच्यापर्यंत आवश्यक वस्तू पोहोचविण्यासाठी शरद पवार, माजी उपमुख्यमंत्री अजित पवार हे स्वतः त्या भागात जाऊन आले आहेत. 

५१ वर्षांपूर्वी बेपत्ता झालेल्या हवाई दलाच्या विमानाचे अवशेष मिळाले

रविवारी मुंबईमध्ये राष्ट्रवादी काँग्रेसच्या महिला पदाधिकाऱ्यांशी संवाद साधताना शरद पवार म्हणाले, मी येत्या २० ऑगस्टला मुख्यमंत्र्यांची भेट घेणार आहे. जर आपल्या मागण्या मान्य केल्या तर ठीक आहे. नाहीतर आपण रस्त्यावर उतरायचे. पूरग्रस्तांच्या मदतीसाठी अनेक जण पुढे आले असताना यामध्ये राष्ट्रवादी काँग्रेसने महत्त्वाची भूमिका निभावली असल्याबद्दल मला आनंद आहे. अडचणीच्यावेळी जो आपल्यासोबत उभा राहतो, लोक त्याला कधीच विसरत नाहीत, असेही त्यांनी सांगितले.