पुढील बातमी

class="fa fa-bell">ठळक बातम्या:

मुस्लिम आरक्षणावर उद्धव ठाकरे गप्प का, भाजपचा सवाल

उद्धव ठाकरे (PC Mohd Zakir)

शिवसेना भाजपपासून वेगळी झाली आहे. हिंदुत्त्वापासून नाही. हिंदुत्त्व म्हणजे भाजप नाही, अशी टीका मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी अयोध्या येथे भाजपवर केली होती. मुख्यमंत्री ठाकरे यांच्या या टीकेवर भाजपने निशाणा साधला आहे. उद्धव ठाकरे आणि त्यांच्या पक्षाने काँग्रेस नेत्यांनी सावरकर यांच्याविषयी केलेल्या वक्तव्यावर मौन का बाळगून आहे, असा सवाल भाजपने केला आहे. 

Yes Bank: ३० तासांच्या चौकशीनंतर ईडीने राणा कपूर यांना केली अटक

मुख्यमंत्री झाल्यानंतर पहिल्यांदाच अयोध्या येथे आलेले उद्धव ठाकरे यांनी शनिवारी भाजपपासून शिवसेना वेगळी झाली असली तरी हिंदुत्त्वापासून वेगळी झाली नसल्याचे म्हटले होते. 

हिंदुत्त्व म्हणजे भाजप नाही, अयोध्येत मुख्यमंत्री ठाकरेंचा टोला

महाराष्ट्र भाजपने यासंबंधी टि्वट करुन शिवसेनेला काही प्रश्न विचारले आहेत. तुम्ही तेव्हा का गप्प बसलात जेव्हा मध्य प्रदेश सरकारने (काँग्रेस सरकार) छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा हटवला होता? गेल्या महिन्यात छिंदवाडा येथील सौसर प्रशासनाने छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा जेसीबीच्या सहाय्याने हटवला होता. हा पुतळा विनापरवाना होता, असा प्रशासनाचा दावा होता. 

फुल न फुलाची पाकळी! शिवसेनेकडून राम मंदिरासाठी १ कोटी

भाजपने म्हटले की, तुम्ही तेव्हा का गप्प बसलात जेव्हा काँग्रेसने सावरकर यांचा अपमान केला ? तुम्ही मुसलमानांना आरक्षण का देत आहात?, असा सवाल केला. राज्याचे अल्पसंख्यक मंत्री तथा राष्ट्रवादीचे नेते नवाब मलिक यांनी विधान परिषदेत मुस्लिम आरक्षणाबाबत भाष्य केले होते. राज्य सरकार सरकारी आणि शैक्षणिक संस्थांमध्ये मुस्लिम समाजाला ५ टक्के आरक्षण देण्याचा प्रस्ताव आणणार असल्याचे म्हटले होते. नंतर मुख्यमंत्री ठाकरे यांनी असा कोणताच प्रस्ताव आलेला नाही तसेच यावर काही निर्णयही झाला नसल्याचे स्पष्ट केले होते.

महिला दिन विशेष : ''अशा स्त्रियांकडे 'अतिशहाणी' म्हणून पाहिलं जातं''

माजी मंत्री तथा भाजप नेते सुधीर मुनगंटीवार यांनीही ठाकरे यांच्यावर टीका करताना म्हटले की, भगवान राम यांनी राज्यातील विद्यमान सत्तारुढ पक्षांना (शिवसेना, काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेस) नव्हे तर जुने सहकारी (भाजप आणि शिवसेना) एकत्रित आशीर्वाद दिले होते. भगवान राम हे सत्ताप्रेमीच्या रुपात कधीच गेले नाहीत. आम्हाला फक्त एक असे राम आठवतात की जे दिलेल्या वचनाचा सन्मान राखत १४ वर्षांसाठी वनवासाला गेले होते, अशा शब्दांत त्यांनी शिवसेनेला टोला लगावला.

  • Marathi News: संबंधित इतर बातम्या वाचण्यासाठी आम्हाला लाईक करा आणि फॉलो करा.
  • Web Title:why shiv sena cm uddhav thackeray silence on muslim reservation and savarkar issue ask by bjp