पुढील बातमी

class="fa fa-bell">ठळक बातम्या:

लोकांना घाबरवत का आहात, राज ठाकरेंचा सवाल

राज ठाकरे

शिवजयंतीसाठी औरंगाबाद येथे दाखल झालेले मनसे प्रमुख राज ठाकरे यांना कार्यक्रम आयोजित करण्यास नकार देण्यात आला आहे. कोरोना विषाणूच्या पार्श्वभूमीवर प्रशासनाने कार्यक्रमांना नकार दिला आहे. परंतु, यावर राज ठाकरे यांनी नाराजी दर्शवली आहे. कोरोना विषाणूमुळे औरंगाबाद महापालिकेची निवडणूक पुढे ढकलणार का असा सवाल त्यांनी उपस्थित केला आहे. आपल्याकडे अद्याप त्याची तीव्रता नाही. 'पॅनिक' करण्यासारखं राज्यात घडलेले नाही. लोकांना का घाबरवत आहात, असा सवाल राज ठाकरे यांनी प्रशासनाला केला आहे. ते औरंगाबाद येथे प्रसारमाध्यमांशी बोलत होते. 

पुण्यानंतर मुंबईत आढळले कोरोनाचे दोन रुग्ण, राज्यातील आकडा ७ वर

येत्या काही दिवसांत औरंगाबाद महापालिकेची निवडणूक होणार आहे. यासाठी मनसेने तयारी सुरु केली आहे. त्याच अनुषंगाने राज ठाकरे यांचे औरंगाबाद दौरे ही वाढले आहेत. तिथीनुसार गुरुवारी (दि.१२) शिवजयंती साजरी होत आहे. मनसेच्या वतीने शिवजयंतीनिमित्त मिरवणूक आणि विविध कार्यक्रमांचे आयोजन केले आहे. परंतु, प्रशासनाने कोरोना विषाणूच्या पार्श्वभूमीवर कार्यक्रमांना नकार दिला आहे. त्यावर राज ठाकरे यांनी नाराजी दर्शवरी आहे. 

भाजपकडून उदयनराजेंसह आठवलेंना राज्यसभेची उमेदवारी

राज ठाकरे पुढे म्हणाले की, नाशिकला १४४ कलम लागू करण्यात आले आहे. पोलिसांनाच माहिती नाही याबाबत. प्रशासन दहशत निर्माण करत आहे. लोकांना घाबरवत आहे. शिवजयंतीला का परवानगी नाही, मग औरंगाबादच्या निवडणुका पुढे ढकलणार का, असा प्रश्न त्यांनी विचारला.