पुढील बातमी

class="fa fa-bell">ठळक बातम्या:

बंगालमध्ये काय सुरु आहे? मोहन भागवतांचा संतप्त सवाल

मोहन भागवत

पश्चिम बंगालमध्ये राजकीय वातावरण तापलेले असतानाच राज्यातील डॉक्टर त्यांच्यावर झालेल्या हल्ल्यानंतर बेमुदत संपावर गेले आहेत. त्यामुळे राज्यातील रुग्णांची हेळसांड होत आहे. याचदरम्यान, राष्ट्रीय स्वंयसेवक संघ प्रमुख मोहन भागवत यांनी ममता बॅनर्जी यांचे नाव न घेता त्यांच्यावर शरसंधान साधले आहे. राज्यात जर एखादा हिंसाचार होत असेल. तर त्यावर निंयत्रण आणले पाहिजे. जर राज्याचा राजा (मुख्यमंत्री) असे करु शकला नाही. तर त्याला स्वतःला राजा म्हणण्याचा अधिकार नाही, असे ते म्हणाले. बंगालमध्ये काय सुरु आहे ? निवडणुकीनंतर असे (हिंसा) कधी होते का ? असे दुसऱ्या राज्यात कुठे होत आहे का ? असे व्हायला नको, अशा प्रश्नांची सरबत्ती त्यांनी केली.

राष्ट्रभक्तीचा दिखावा नकोः मोहन भागवत

नागपूर येथे आयोजित एका कार्यक्रमात ते बोलत होते. जर काही व्यक्तींमुळे असे होत असेल तर शासन-प्रशासनाने पुढे येत परिस्थिती निंयत्रणात आणली पाहिजे. ते याकडे दुर्लक्ष करु शकत नाहीत.

RSS ची विचारधारा देशासाठी घातकः शरद पवार

काही व्यक्ती या असमंजस असू शकतात. बेजबाबदार काम करु शकतात. पण समाज हितासाठी राष्ट्राची एकात्मता आणि अखंडता निश्चित करण्याचा प्रयत्न करण्याची राज्याच्या राजाची जबाबदारी आहे. जर एखाद्या राजाला हे करण्यात अपयश आले तर त्याला राजा म्हणून घेण्याचा कोणताच अधिकार नाही. 

RSS प्रमुख भागवत म्हणाले, राम का काम करना है !

दरम्यान, राज्यात लोकसभा निवडणुकीनंतर सत्ताधारी तृणमूल काँग्रेस आणि भाजपच्या कार्यकर्त्यांमध्ये अनेक ठिकाणी हिंसाचाराचे वृत्त आले आहे. मागील आठवड्यात उत्तर २४ परगणा जिल्ह्यात दोन्ही पक्षाच्या कार्यकर्त्यांदरम्यान झेंडा लावण्यावरुन हाणामारी झाली होती. यात भाजपने त्यांच्या ५ कार्यकर्त्यांची हत्या झाल्याचा तर टीएमसीने तिघांची हत्या झाल्याचा दावा केला होता.