पुढील बातमी

class="fa fa-bell">ठळक बातम्या:

एकनाथ खडसे खरंच भाजपला अलविदा करणार का याकडे राज्याचे लक्ष

भाजपचे नेते आणि माजी मंत्री एकनाथ खडसे

राज्यातील भाजपच्या नेतृत्त्वावर जोरदार टीका केल्यानंतर आता माजी मंत्री आणि पक्षाचे ज्येष्ठ नेते एकनाथ खडसे कोणता निर्णय घेणार, ते भाजपला अलविदा करणार का, याकडे राज्याचे लक्ष लागले आहे. एकनाथ खडसे यांनी नागपूरमध्ये शरद पवार यांची भेट घेतली. त्यानंतर एकनाथ खडसे राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये जाणार असल्याची चर्चा सुरू झाली. पण त्याला अधिकृत दुजोरा मिळालेला नाही.

'जे आधीपासून पाकिस्तानचे नागरिक आहेत त्यांना आपले नागरिकत्व का?'

राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते आणि आमदार दिलीप वळसे-पाटील म्हणाले, एकनाथ खडसे राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये येणार का, याबद्दल मला माहिती नाही. पण ते मोठे नेते आहेत. ते पक्षात आले तर त्यांचे स्वागतच आहे. 

राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रवक्ते नवाब मलिक म्हणाले, शरद पवार आणि एकनाथ खडसे यांची भेट व्यक्तिगत स्वरुपाची होती. त्यांनी अद्याप कोणताही निर्णय घेतलेला नाही. पण भाजपमध्ये त्यांचे खच्चीकरण केले गेले आहे. त्यामुळे त्यांची मनःस्थिती वेगळी आहे. ते भाजपवर नाराज आहेत.

अयोध्येतील राम मंदिर उभारणीसाठी सरकार पैसे देणार नाही - अमित शहा

गेल्या आठवड्यात गोपीनाथ गडावर केलेल्या भाषणात एकनाथ खडसे यांनी राज्यातील भाजप नेतृत्त्वावर जोरदार टीका केली होती.