पुढील बातमी

class="fa fa-bell">ठळक बातम्या:

दिल्लीत पोलिसांवर झालेल्या हल्ल्याप्रकरणी शरद पवार म्हणाले...

शरद पवार

दिल्लीमध्ये तीस हजारी न्यायालयात वकील आणि पोलिसांमध्ये झालेल्या हाणामारीचा आणि त्यानंतर पोलिसांनी केलेल्या आंदोलनाचा मुद्दा गंभीर असल्याचे राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी म्हटले आहे. त्याचबरोबर केंद्र सरकारला या प्रकरणी आपली जबाबदारी टाळता येणार नाही, असेही त्यांनी स्पष्ट केले.

दिल्लीत अहमद पटेलांनी घेतली नितीन गडकरींची भेट आणि...

मुंबईत पत्रकार परिषदेत शरद पवार यांनी दिल्लीतील घटनेचा उल्लेख करून सांगितले की, गणवेषात असलेल्या व्यक्तीवर हल्ला झाल्यावर त्याचे मनोधैर्य खच्ची होते. त्याचा परिणाम गणवेषातील इतर व्यक्तींवर आणि सुरक्षा दलांवर होत असतो. त्यामुळे हा प्रकार गंभीर आहे. मी या प्रकरणी बार कौन्सिलच्या प्रमुखांशी बोलणार आहे. पण दिल्ली पोलिस हे थेट केंद्र सरकारच्या अखत्यारित येतात. त्यामुळे केंद्र सरकारला आपली जबाबदारी टाळता येणार नाही, असेही त्यांनी सांगितले.

अतिवृष्टी झालेल्या शेतकऱ्यांना तातडीने मदत करा
राज्याच्या अनेक भागात अवकाळी अतिवृष्टीने शेतकऱ्यांचे मोठे नुकसान झाले आहे. अतिवृष्टी झालेल्या भागात शेतकऱ्यांना आर्थिक मदतीची, कर्जमाफीची आणि नवीन पीक घेण्यासाठी पुन्हा कर्जपुरवठा घेण्याची आवश्यकता आहे. त्यामुळे सरकारने याकडे तातडीने लक्ष दिले पाहिजे, असे त्यांनी सांगितले. 

LIVE: शिवसेनेनं आडमुठेपणाची भूमिका सोडावी - रामदास आठवले

त्याचबरोबर या प्रकरणी विमा कंपन्यांना बोलावून त्यांनाही आवश्यक सूचना दिल्या पाहिजे. विमा कंपन्या आपली जबाबदारी पूर्णपणाने पार पाडायला तयार नाहीत, याकडेही त्यांनी लक्ष वेधले.

अयोध्येचा निकाल लागल्यावर शांतता राखा
अयोध्येतील रामजन्मभूमी-बाबरी मशिद प्रकरणाचा निकाल लवकरच लागणार आहे. त्या पार्श्वभूमीवर न्यायालयाच्या निर्णयाचा सर्वांनी आदर केला पाहिजे. आलेला निकाल आपल्याविरोधात आहे, असे कोणीही समजू नये. काहीही निकाल लागला तरी कायदा हातात घेऊ नये, असे आवाहन शरद पवार यांनी केले.