पुढील बातमी

class="fa fa-bell">ठळक बातम्या:

पूरग्रस्तांच्या पुनर्वसनासाठी वेळ प्रसंगी कर्ज काढू: चंद्रकांत पाटील

चंद्रकांत पाटील

राज्यातील वेगवेगळ्या परिसरात पडलेल्या मुसळधार पावसाने अनेक ठिकाणी पूरजन्य परिस्थिती निर्माण झाली. सांगली-कोल्हापूर जिल्ह्यातील अनेक संसार पाण्यात बुडाले. पावसाच्या थैमानाने पुराचा फटका बसलेल्या कुटुंबियांसाठी आता मदतीचा ओघ सुरु झाला आहे. यासाठी राज्य सरकारने केंद्राकडे जवळपास ६ हजार कोटींच्या मदत मागितली आहे. 

राज्य सरकार पूरग्रस्तांच्या पाठीशी असून पुरामध्ये घरे उद्धवस्त झालेल्या प्रत्येकाला निवारा देण्यासाठी सरकार कटीबद्ध असल्याचे राज्याचे महसुलमंत्री आणि भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी म्हटले आहे. सरकार प्रत्येक व्यक्तीचे पुनर्वसन करणार आहे. गरज पडल्यास यासाठी सरकार कर्ज देखील काढेल, असे चंद्रकांत पाटील यांनी सांगितले. 

पूरग्रस्त भागासाठी राज्य सरकारकडून केंद्राकडे ६ हजार कोटींची मागणी

पुण्यातील शासकीय बैठकीनंतर त्यांना सांगली आणि कोल्हापूर येथील नागरिकांचे पुनर्वसन कशा प्रकारे करणार? असा प्रश्न विचारण्यात आला होता. यावेळी चंद्रकांत पाटील म्हणाले की, राज्यात ४ लाख ५३ हजार लोकांना पुरस्थितीतून सुरक्षित बाहेर काढण्यात आले आहे. सद्यपरिस्थित राज्यात ५०० पेक्षा अधिक  निवारा केंद्रावर ३ लाखपेक्षा अधिक  पूरग्रस्तांना स्थलांतरित करण्यात आले आहे.  पुराचा फटका बसलेल्या गावांच्या पुनर्वसनासाठीची प्रक्रिया किमान सहा ते आठ महिने चालेल असेही त्यांनी सांगितले. ते पुढे म्हणाले की, ६ हजार ८०० कोटीच्या निधीमध्ये शेती नव्याने उभारण्याचे आपल्यासमोर आव्हान असणार आहे. पूरग्रस्त शेतकर्‍यांच्या कर्ज माफीसाठी प्रयत्न सुरू असल्याचे त्यांनी सांगितले. प्रत्येक आठवड्याला होणार्‍या मंत्रिमंडळाच्या बैठकीनंतर पूरग्रस्तांच्या पुनर्वसनाचा आढावा घेतला जाईल, अशी माहिती देखील त्यांनी यावेळी दिली.

 

  • Marathi News: संबंधित इतर बातम्या वाचण्यासाठी आम्हाला लाईक करा आणि फॉलो करा.
  • Web Title:We will also take out loan for sangli kolhapur and othr flood rehabilitation says Chandrakant Pati