एल्गार आणि भीमा-कोरेगाव हे दोन वेगळे विषय आहेत. दलित बांधवांचा जो विषय आहे तो भीमा-कोरेगावबद्दल आहे आणि त्याचा तपास मी केंद्राकडे दिलेला नाही आणि देणारही नाही. मी स्पष्टपणे सांगू इच्छितो की, दलित बांधवांवर अन्याय होऊ देणार नाही, असा खुलासा मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी केला. एल्गार आणि भीमा-कोरेगावचा तपास एनआयएकडे दिल्याचे वृत्त माध्यमांत येत आहे. तसेच राजकीय नेत्यांकडूनही यावर चर्चा केली जात आहे. राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनीही नाराजी व्यक्त केली होती. या पार्श्वभूमीवर उद्धव ठाकरे यांचे हे वक्तव्य अत्यंत महत्त्वपूर्ण मानले जाते.
शिवसेनेची भूमिका जाहिरातदार ठरवत नाहीः उद्धव ठाकरे
दलितांवर कोणत्याही परिस्थितीत अन्याय होऊ देणार नसल्याचे त्यांनी आवर्जुन सांगितले. यावेळी ठाकरे यांनी सीएए, एनआरसीवरही आपले मत व्यक्त केले. सीएए-एनआरसी हे दोन वेगळे विषय आहेत. सीएएमुळे काहीच अडचण येणार नाही. तर एनआरसी कोणत्याही परिस्थितीत राज्यात लागू करु देणार नाही. केंद्रानेही अद्याप यावर काहीच भाष्य केलेले नाही. एनपीआर ही जणगणनाच आहे. ती दर १० वर्षांनी होतच असते. त्यामुळे त्यात काही अडचण येईल असे वाटत नसल्याचे ठाकरे यांनी म्हटले.
Maharashtra CM Uddhav Thackeray: If NRC is implemented then it will affect not only Hindus or Muslims but also Adivasis. Centre has not discussed NRC as of now. NPR is a census, and I don’t find that anyone will be affected as it happens every ten years. https://t.co/e8AdMif6ks
— ANI (@ANI) February 18, 2020
दरम्यान, शिवसेनेचे धोरण व निर्णय मी ठरवतो, जाहिरातदार नाही, असे स्पष्टीकरण मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी दिले आहे. काही दिवसांपूर्वी 'सामना' या शिवसेनेच्या मुखपत्रात रिफायनरीची जाहिरात प्रसिद्ध झाल्यानंतर सेनेवर मोठ्याप्रमाणात टीका करण्यात येत होती. विरोधकांनी शिवसेनेच्या सतत बदलणाऱ्या धोरणावर टीका केली होती. निवडणुकीनंतर शिवसेनेची भूमिका बदलली असा आरोप केला जाऊ लागला होता. या वादावर मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी आज पडदा टाकला.