पुढील बातमी

class="fa fa-bell">ठळक बातम्या:

भाजपला विरोध करणारा 'देशद्रोही' हा भ्रम : उद्धव ठाकरे

मुख्यमंत्री उद्धव ठाकरे

नागरिकत्व दुरुस्ती विधेयक सोमवारी लोकसभेत मंजूर झाले. या विधेयकाला समर्थन दिल्याने काँग्रेसमधून नाराजीचा सूर उमटत असताना राज्यसभेत विधेयकाला समर्थन देणार नसल्याचे  मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी म्हटले आहे. विधेयकाबाबत स्पष्टता येत नाही तोपर्यंत शिवसेना या विधेयकाला समर्थन देणार नाही.

शिवसेनेसोबत जाण्याच्या काँग्रेसच्या निर्णयाचा अमित शहांकडून असा

आम्ही कोणाला काय वाटते या उद्देशाने बाजू मांडत नाही तर राष्ट्रहिताचा विचार करुन भूमिका मांडत असतो. सध्याच्या घडीला भाजप जो काही निर्णय घेते तो देशभक्ती आणि इतरांनी त्यांना विरोध केला तर तो देशद्रोही असा प्रकार सुरु आहे. हा एक भ्रम असून तो बाळगू नये, अशा शब्दांत उद्धव ठाकरे यांनी भाजपवर निशाणा साधला. 

'शिवसेनेने विधेयकाच्या बाजूने मतदान केले हे योग्य नाही'

नागरिकत्व दुरुस्ती विधेयक सोमवारी लोकसभेत मंजूर झाले. या विधेयकाच्या बाजूने ३११ खासदारांनी मतदान केले तर विरोधामध्ये ८० खासदारांनी मतदान केले. तब्बल १२ तासांच्या चर्चेनंतर सोमवारी रात्री नागरिकत्व दुरुस्ती विधेयक लोकसभेत मंजूर झाले. राज्यसभेत या विधेयकाला मंजुरी मिळणार का? हे पाहणे महत्त्वाचे ठरेल.

  • Marathi News: संबंधित इतर बातम्या वाचण्यासाठी आम्हाला लाईक करा आणि फॉलो करा.
  • Web Title: We have suggested changes in Citizenship Amendment Bill we want in Rajya Sabha It is an illusion that only BJP cares for the country Maharashtra CM Uddhav Thackeray