पुढील बातमी

class="fa fa-bell">ठळक बातम्या:

राज्यातील एकाही प्रकल्पाला स्थगिती नाही: CM उद्धव ठाकरे

मुख्यमंत्री उद्धव ठाकरे

सध्याच्या घडीला राज्यात सुरु असलेल्या आणि रखडलेल्या प्रकल्पांचा मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी मंगळवारी आढावा घेतला. यासंदर्भात तब्बल चार तास झालेल्या बैठकीनंतर विकासाच्या कोणत्याही प्रकल्पाला स्थगिती देण्यात आलेली नाही, असे त उद्धव ठाकरे यांनी म्हटले आहे.  विकास प्रकल्प वेगाने मार्गी लावू, अशी ग्वाही देखील त्यांनी प्रसारमाध्यमांशी संवाद साधताना दिली. 

सुप्रिया सुळे म्हणाल्या पंतप्रधान मोठ्या मनाचे, पण...

मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी मंगळवारी विशेष बैठक बोलावून राज्यातील सर्व पायाभूत प्रकल्पांचा आढावा घेतला. या बैठकीनंतर फडणवीस सरकारने घेतलेल्या निर्णयाला ब्रेक लागणार का? अशी चर्चा रंगली होती. मात्र बैठकीनंतर उद्धव ठाकरे यांनी या चर्चेला पूर्णविराम दिला. उद्धव ठाकरे म्हणाले की, सध्याच्या घडीला राज्यात कोणते पायाभूत प्रकल्प सुरू आहेत. त्याचा राज्यावर किती आर्थिक बोजा येऊ शकतो याचा आढावा घेण्यात आला. तसेच प्रकल्पाला गती देण्यासंदर्भात चर्चा करण्यात आली, असे ते म्हणाले. आरे कारशेड व्यतिरिक्त कोणत्याही कामाला स्थगिती देण्यात आलेली नाही, असेही उद्धव ठाकरे यांनी स्पष्ट केले.  

'बुलेट ट्रेन सारखे प्रकल्प पुढे ढकलता येईल का? याचा विचार सुरु'

यावेळी त्यांना भीमा-कोरेगाव प्रकरणातील गुन्हे मागे घेण्यात येणार का? असा प्रश्न विचारण्यात आला होता. यावर ते म्हणाले की, मागील सरकारने भीमा-कोरेगाव प्रकरणातील किरकोळ स्वरुपातील गुन्हे मागे घेण्याचे आदेश दिले होते. त्या आदेशाची अंमलबजावणी झाली की नाही, याचा आढावा घेतल्याचे त्यांनी सांगितले.

  • Marathi News: संबंधित इतर बातम्या वाचण्यासाठी आम्हाला लाईक करा आणि फॉलो करा.
  • Web Title:We have not imposed any ban on any project in the meeting says Maharashtra Chief Minister Uddhav Thackeray