पुढील बातमी

class="fa fa-bell">ठळक बातम्या:

काँग्रेस, राष्ट्रवादीशी चर्चा नाही पण पर्याय खुले - उद्धव ठाकरे

उद्धव ठाकरे (PTI file photo)

राज्यात भाजप सर्वात मोठा पक्ष आहे. त्यातच मावळते मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी पुन्हा आमचेच सरकार येईल, असे म्हटले आहे. त्यामुळे त्यांनी त्यांचे मार्ग निवडावेत. त्यांना जर सगळे पर्याय खुले असतील तर मग आम्हाला आमचे पर्याय खुले आहेत, असे शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी शुक्रवारी स्पष्ट केले. त्याचवेळी अजूनपर्यंत आमची काँग्रेस किंवा राष्ट्रवादी काँग्रेसशी कोणतीही चर्चा झालेली नसल्याचे त्यांनी सांगितले.

शिवसेनेवर पहिल्यांदाच खोटारडेपणाचा आरोपः उद्धव ठाकरे

अहमद पटेल नितीन गडकरींना भेटतात. प्रफुल्ल पटेल आणखी कोणाला भेटतात. आता भाजपच्याच लोकांनी त्यांची आमच्याशी ओळख करून द्यावी, म्हणजे आम्हाला चर्चा करता येईल, असा टोमणा मारत उद्धव ठाकरे यांनी जर भाजपपुढे सर्व पर्याय असतील तर आमच्यापुढेही सर्व पर्याय खुले असल्याचे उद्धव ठाकरे यांनी स्पष्ट केले.

उद्धवजींनी माझे फोन उचलले नाहीत, फडणवीसांचा आरोप

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी शुक्रवारी दुपारी राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांना भेटून त्यांच्याकडे आपल्या पदाचा राजीनामा दिला. त्यानंतर त्यांनी घेतलेल्या पत्रकार परिषदेत सत्तावाटपात मुख्यमंत्रीपद अडीच अडीच वर्षे वाटून घेण्याबद्दल काहीही ठरले नव्हते, असे सांगितले. त्या पार्श्वभूमीवर उद्धव ठाकरे यांनी शुक्रवारी संध्याकाळी पत्रकार परिषद घेतली. याच पत्रकार परिषदेत त्यांनी नक्की खोटं कोण बोलतंय हे महाराष्ट्राच्या नेत्यांना माहिती असल्याचे सांगितले.

  • Marathi News: संबंधित इतर बातम्या वाचण्यासाठी आम्हाला लाईक करा आणि फॉलो करा.
  • Web Title:we did not discussed anything with congress ncp but we have options open says uddhav thackeray