पुढील बातमी

class="fa fa-bell">ठळक बातम्या:

निवडणुकांसाठी आम्हाला यात्रा काढायची गरज नाही, प्रकाश आंबेडकरांचा टोला

प्रकाश आंबेडकर

निवडणुकांसाठी आम्हाला कोणतीही यात्रा काढायची गरज नाही. आम्ही लोकसभेच्या वेळेसच जमिनीची मशागत केली असल्याचा, असा टोला वंचित बहुजन आघाडीचे नेते प्रकाश आंबेडकर यांनी भाजप आणि शिवसेनेला लगावला.  यात्रेशिवाय आम्ही निवडणुका जिंकू शकतो, असेही ते म्हणाले. नागपूर येथे ते बोलत होते.

काँग्रेसचे राज्यातील आणि केंद्रातील नेतृत्व वेगवेगळी भाषा बोलते. त्यांच्यातच एकवाक्यता नाही. दुर्दैवाने काँग्रेस-राष्ट्रवादीचे राज्याचे नेतृत्व कुटुंबवादी आहे. काँग्रेस आणि राष्ट्रवादीची आघाडी कुटुंबशाहीची आघाडी आहे. त्यांच्या याच कुटुंबशाहीच्या राजकारणामुळे मागील निवडणुकीत त्यांना अपयश आल्याचे ते म्हणाले.

खासगी नोकरीत स्थानिकांना ७५ टक्के आरक्षण देणारः अजित पवार

तिसऱ्या आघाडीबाबत आम्ही ठाम आहोत. अनेक जण वेगवेगळी वक्तव्ये करत आहेत. त्यामुळे कोण आमच्यासोबत येईल आणि कोण येणार नाही हे आताच सांगता येणार नाही. सीपीएममधला एक गट आणि सत्यशोधक कम्युनिस्ट पार्टी आमच्यासोबत आहे. इतरांसोबत चर्चा सुरू असल्याचे आंबेडकर म्हणाले. येत्या १० ऑगस्टपर्यंत आघाडीचे चित्र स्पष्ट होणे अपेक्षित आहे. तसे न झाल्यास १५ ऑगस्टनंतर आमचे उमेदवार जाहीर करणे सुरू करू. त्याच वेळी आमचे धोरणही जाहीर करू, असेही ते म्हणाले.

वंचित आघाडी संघ स्वयंसेवकांच्या हाती, लक्ष्मण मानेंचा गंभीर आरोप