पुढील बातमी

class="fa fa-bell">ठळक बातम्या:

गतवेळी जिंकलेली एकही जागा भाजप सोडणार नाहीः दानवे

रावसाहेब दानवे

विधानसभा निवडणुकीबाबत शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे आणि मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे जरी 'आमचं ठरलंय' असे म्हणत असले तरी प्रत्यक्षात दोन्ही पक्षांच्या नेत्यांकडून वेगवेगळी वक्तव्ये केली जात आहेत. गत विधानसभा निवडणुकीवेळी भाजपने जिंकलेली एकही जागा सोडणार नसल्याचे भाजपचे प्रदेशाध्यक्ष आणि केंद्रीय मंत्री रावसाहेब दानवे स्पष्ट केले आहे. एबीपी माझाशी बोलताना त्यांनी ही माहिती दिली.

महाराष्ट्राचा पुढचा मुख्यमंत्री भाजपचाचः सरोज पांडे

शिवसेना-भाजपचा ५०-५० टक्के फॉर्म्युला ठरला आहे. महायुतीतील मित्रपक्षांचे काय करायचे ते तेव्हाच ठरवू, असेही त्यांनी यावेळी सांगितले.

शेतकऱ्याला नडाल तर गाठ शिवसेनेशी, उद्धव ठाकरेंचा इशारा

दरम्यान, भाजपच्या महाराष्ट्रच्या प्रभारी सरोज पांडे यांनी विधानसभा निवडणुकीनंतर पुढचा मुख्यमंत्री हा भाजपचाच असेल, असे म्हटले आहे. राज्याचे जलसंपदा मंत्री गिरीश महाजन यांनीही लोकसभा निवडणुकीच्या निकालाने कोण मोठा भाऊ हे दिसल्याचे म्हटले. भाजपचे २३ आणि शिवसेनेचे १८ खासदार निवडून आले आहेत. लोकसभा निवडणुकीदरम्यान अनेक जागांवर शिवसेनेच्या विजयासाठी भाजपने मेहनत घेतली होती, असा दावाही महाजन यांनी केला होता.

मनं जुळली आता एका युतीची दुसरी गोष्ट : उद्धव ठाकरे